एक्स्प्लोर

कोयता-बंदुका घेऊन 14-15 जणांची गँग आली, काही कळायच्या आत वनराज आंदेकरांना घेरलं, अंगावर काटा आणणारं CCTV फुटेज

Vanraj Andekar Pune Crime: वनराज आंदेकर यांची काल पुण्यातील नाना पेठेत हत्या करण्यात आली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Vanraj Andekar Pune Crime: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाळून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली.  वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले. तसेच यानंतर वनराज आंदेकर कोयत्याने वार देखील केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटनेचं भयानक सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलं आहे. 

नाना पेठेत वनराज आंदेकर (Vanraj Anderkar) आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते. यावेळी जवळपास सात दुचाकीवरुन जवळपास 14 ते 15 जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. वनराज आंदेकर यांच्यावर (Pune Crime News) हल्ला करुन सर्व घटनास्थळावरुन पळ काढतात. 

पोलिसांनी तीन जणांना घेतलं ताब्यात-

वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात काल रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करुन खून केला होता. वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जयंत कोमकर आणि गणेश कोमकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे सध्या समोर आली आहे.

पोलिसांनी व्यक्त केला संशय-

पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बोलताना सांगितलं की, रविवारी संध्याकाळी (2 सप्टेंबर) साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आलेले आहेत.

कोण आहे वनराज आंदेकर?

वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. 

संबंधित बातमी:

पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर बेछुट गोळीबार, नंतर कोयत्यानं वार; पोलीस सह आयुक्तांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

पाहा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget