एक्स्प्लोर

Uttar Pradesh Crime News: लग्न होताच रात्री खोलीत गेले, सकाळी दाम्पत्याचा मृत्यू; तपासामध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Uttar Pradesh Crime News: प्रदीप आणि शिवानीचं 7 मार्च रोजी लग्न झालं. सर्वजण खूप आनंदात होतं. लग्नही नीट पार पडलं. नवरा-नवरी दोघंही खूश होते.

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अयोध्यामधून (Uttarpradesh Honeymoon News) एक धक्कादायक घटना 7 मार्च रोजी घडली होती. हनिमूनदरम्यान नवं दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. प्रदीप आणि शिवानी असं या नवविवाहित जोडप्याचं नाव होतं. 

लग्न झाल्यानंतर रात्री प्रदीप आणि शिवानी त्यांच्या खोलीत गेले. सकाळी झाली पण दरवाजा उघडला नसल्याने कुटुंबीयांना भिती वाटली. बाहेरुन दरवाजा ठोठावला, पण तरीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर कुटुंबीयांना समोर जे दृश्य दिसले त्याने सर्वांनाच धक्का बसला. 

वधू शिवानीचा मृतदेह बेडवर पडला होता आणि प्रदीप खोलीतील पंख्यावर लटकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रदीपने आधी पत्नी शिवानीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:ला गळफास लावून घेतला. सकाळी कुटुंबीयांनी दरावाज तोडून खोलीत प्रवेश केल्यानंतर दोघंही मृतावस्थेत पडले होते. दरवाजा आतून बंद होता, अशा परिस्थितीमध्ये तिसरा कोणी खोलीत असण्याची शक्यता फार कमी आहे. दोघांचेही मोबाईल कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅटिंगची तपासणी केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितले. 

प्रदीपच्या मोबाईलवर कोणीतरी पाठवला होता मेसेज-

प्रदीपच्या मोबाईलवर कोणीतरी मेसेज पाठवला होता, असेही समोर आले आहे. प्रदीपला हा मेसेज नेमका कोणी पाठवला आणि मेसेजमध्ये काय म्हटलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रदीपने शिवानीला सांगितले  की, तुझे आधीच प्रेमसंबंध होते, लग्नाच्या रात्री प्रदीप आणि शिवानीमध्ये याच गोष्टीवरुन वाद झाल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व अंदाज वर्तवले जात आहे, अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिली नाही. 

प्रदीप आणि शिवानीचं 7 मार्चला झालं होतं लग्न-

प्रदीप आणि शिवानीचं 7 मार्च रोजी लग्न झालं. सर्वजण खूप आनंदात होतं. लग्नही नीट पार पडलं. नवरा-नवरी दोघंही खूश होते. आपापसात गप्पा मारत होते. दोघांच्या संमतीनेच हे लग्न ठरलं होतं. पण असं नेमकं काय झालं हे समजत नाही असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. मुलाच्या मोठ्या भावाने सांगितलं की, रविवारी रिसेप्शन होतं. ज्याची जोरदार तयारी सुरू होती. मी कुटुंबातील काही इतर सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत भाज्या खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मी भाज्या खरेदी करत असताना मला घरून फोन आला. कुटुंबातील सदस्यांनी लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी पोहोचलो तेव्हा कुटुंबातील सर्वजण रडत होते.

संबंधित बातमी:

Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election :  मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, आयोगानं कारवाई करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Embed widget