एक्स्प्लोर

दंगल घडवून तडीपार गुंडाकडून एकाची हत्या; नाशिकमध्ये खळबळ

एका हत्येच्या घटनेने नाशिक सध्या हादरून गेलं आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी रात्री तडीपार गुंड विशाल बैनवालने आपल्या साथीदारांच्या मदतीने हातात धारदार शस्त्रे मिरवत दंगल घडवून आणली.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुहेगारीनं चांगलंच डोकं वर काढलं आहे. नाशिकमधील भद्रकाली परिसरात उठलेली दंगल आणि तडीपार गुंडाने केलेली हत्या, यांमुळे आता आता नाशकात पोलीस आपलं काम चोख बजावत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता असा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून केला जातोय.

एका हत्येच्या घटनेने नाशिक सध्या हादरून गेलं आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी रात्री तडीपार गुंड विशाल बैनवालने आपल्या साथीदारांच्या मदतीने हातात धारदार शस्त्रे मिरवत दंगल घडवून आणली. यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे, जुन्या भांडणाचा राग मनात धरत तसेच पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरून आकाश रजवे आणि करण लोट यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला. आकाशच्या पोटात, मानेवर या टोळीने धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्यानंतर तिथून पळ काढला. आकाश रक्ताच्या थारोळ्यात सापडला आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. तर आकाशचा मित्र करणही यामध्ये गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. तर मयताच्या नातेवाईकांनी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

विशेष म्हणजे पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती तर आकाशचा जीव वाचला असता, आरोप आता आकाशच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. कारण काही गुंडांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन मारहाण केल्याबाबत मृत आकाश आणि त्याच्या मित्रांनी घटनेच्या दीड तासापूर्वीच भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी एकूण 9 आरोपींविरोधात हत्या, हत्येचा कट, दंगल, प्राणघातक हल्ला आणि धारदार शस्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यातील 6 जण सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर तडीपार गुंड विशाल बैनवालसह 2 जण फरार आहेत. जुलै 2019 पासून विशालला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र तडीपार असूनही त्याचा शहरात वावर कसा? तसेच हा गुंड सडेआम दहशत माजवत असतांनाच पोलीस कुठे होते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात प्राणघातक हल्ले, मारहाण, घरफोडीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आणि त्यातच आता असे प्रकार समोर येत असतील तर अशा गुंडांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळणे गरजेच आहे. नाहीतर नाशिकचे नागपूर होण्यास वेळ लागणार नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Goregaon Toilet death: शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना
शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Nagpur Deekshabhoomi Donation: दीक्षाभूमीतील देणगीच्या रकमेत अपहार? नागपूरच्या धर्मदाय आयुक्ताकडे लेखी तक्रार, नेमकं प्रकरण काय?
दीक्षाभूमीतील देणगीच्या रकमेत अपहार? नागपूरच्या धर्मदाय आयुक्ताकडे लेखी तक्रार, नेमकं प्रकरण काय?
MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक खुलासा, अटक करण्यात आलेले 'ते' दोन्ही उमेदवार परीक्षेत टॉपर, नेमकं काय घडलं?
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक खुलासा, अटक करण्यात आलेले 'ते' दोन्ही उमेदवार परीक्षेत टॉपर, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget