एक्स्प्लोर

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्याच्या मानपाड्यात ठाकरेंच्या सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची काल गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली.

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्याच्या मानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांची काल (29 सप्टेंबर) गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांना ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारापूर्वीच प्रदीप पूर्णेकरांचा मृत्यू (Thane Shivsena UBT Pradeep Purnekar) झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्या मानपाडा येथील कार्यालयाबाहेर ही संपूर्ण घटना घडली असून पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

पप्या शिंदे आणि आकाश निमसे असे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. जुन्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोवर प्रदीप पूर्णेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका पूर्णेकर कुटुंबानं घेतली आहे. दरम्यान सीसीटीव्हीत दोन व्यक्ती चेहऱ्याला रुमाल बांधून दुचाकीवरून प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जात असल्याचं समोर आलंय. या सगळ्या घटनेवर प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना धक्कादायक माहिती समोर आणली आहे. (Pradeep Purnekar Thane Marathi News)

आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले- (Thane Pradeep Purnekar Death Case)

जे.जे. हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी मृतदेह ठेवण्यात आला आहे. पण मृतदेह आल्यानंतर देखील आम्ही तो ताब्यात घेणार नाही. कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जाऊन बसणार, जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर म्हणाले. तसेच मला राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्यावर संशय आहे. कारण काय दिवसांपूर्वी नीलकंठ येथे राजेंद्र शिंदे आणि काल ज्या आरोपींची नावे आलेली आहेत ते आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले, त्यांना मी स्वतः पाहिले आहे. त्यानंतर एक व्यक्ती मला येऊन विचारून गेला की तू प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा आहेस का? यावरून मला संशय होता. म्हणून मी माझ्या वडिलांना आधीच सांगितले होते, काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. राजेंद्र शिंदे यांचे देखील नाव सांगितले होते. तेव्हा वडिलांनी मला रात्री 10 नंतर बाहेर पडू नको असे सांगितले, माझी गोळी तुला लागेल असे देखील सांगितले. त्यामुळे त्यांना देखील आधीपासून हा संशय होता, असा धक्कादायक खुलासा राम पूर्णेकर यांनी केला.

माझ्या वडिलांना न्याय मिळायला पाहिजे, त्यांनी आयुष्यभर न्यायासाठी काम केले- राम पूर्णेकर (Ram Purnekar On Pradeep Purnekar Death Case)

मीनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्यांनी माझ्या वडिलांचे नाव घेतले होते, निवडणुका झाल्यानंतर मी बाळाला संपवेन, अशी धमकी त्यांनी दिली होती त्यामुळे मला मीनाक्षी शिंदेंवर संशय आहे. पप्या शिंदे ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तो हल्ला झाला. तेव्हा ऑफिसमध्ये बसून होता. दोन दिवसापूर्वी देखील तो ऑफिसमध्ये आला होता आणि माझ्या वडिलांशी एक दीड तास गप्पा मारत होता. पण केव्हा ऑफिसमध्ये अनेक लोक होती, काल ऑफिसमध्ये कोणी नव्हते. पप्या शिंदे आम्हाला सांगत होता की, मी गोळी लागल्यानंतर त्यांना पकडले होते. पण पप्यावर एकही वार झाला नाही, त्यांना काहीच लागले नाही, असे कसे होईल?, असा सवालही राम पूर्णेकर यांनी उपस्थित केला. पप्या शिंदे हा हॉस्पिटलमध्ये देखील आला होता आणि कनोजिया याला शिव्या देत होता. पण नंतर पोलिसांनी त्यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. तो माझ्या वडिलांचा जुना मित्र होता. माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की माझ्या वडिलांना न्याय मिळायला पाहिजे. त्यांनी आयुष्यभर न्यायासाठी काम केले आहे, अशी मागणी राम पुर्णेकर यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मला सध्या काही माहिती नाही. मी रात्रभर इथेच आहे, कदाचित त्यांचा फोन येऊन गेला असेल, असंही राम पूर्णेकरांनी सांगितले. 

संबंधित बातमी:

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आधी रेकी, मग एकाकडून सिग्नल, तोंडावर रुमाल बांधले...; ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील हादरवणारा सीसीटीव्ही फुटेज

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
Jalgaon Boat Accident: जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget