Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आधी रेकी, मग एकाकडून सिग्नल, तोंडावर रुमाल बांधले...; ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील हादरवणारा सीसीटीव्ही फुटेज
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: गोळीबार आणि धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला आहे.

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्याच्या मानपाड्यात ठाकरेंच्या सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Shivsena UBT Pradeep Purnekar) यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राचे वार करून हत्या करण्यात आली. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्याचं समोर आलंय. हल्ल्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांना ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील इन्फिनिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारापूर्वीच प्रदीप पुर्णेकरांचा मृत्यू झाला. हल्ला झाला तेव्हाचं दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
आधी रेकी, मग सिग्नल...; पूर्णेकर प्रकरणातील हादरवणारा सीसीटीव्ही फुटेज- (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)
एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबार होतानाचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. तर दुसऱ्या सीसीटीव्हीत जखमी प्रदीप पूर्णेकरांना रुग्णालयात नेत असतानाची दृश्य आहेत. तसेच मागच्या मैदानातून आरोपी आल्याचेही सीसीटीव्हीद्वारे समोर आले आहे. आधी रेकी करून आरोपी मैदानाकडे गेले. नंतर आरोपींपैकी एकाने सिग्नल दिला. मग तोंडाला रुमाल बांधून आरोपी पुन्हा मैदानातून ऑफिसकडे गेले. प्रदीप पूर्णेकरांवर हल्ला केला आणि तिथूनच पुढे पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना घेतलं ताब्यात- (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)
प्रदीप पूर्णेकर यांच्या मानपाडा येथील कार्यालयाबाहेर ही संपूर्ण घटना घडली असून पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पप्या शिंदे आणि आकाश निमसे असं ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत. जुन्या वादातून ही हत्या घडवून आणल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोवर प्रदीप पूर्णेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका पूर्णेकर कुटुंबानं घेतली आहे. दरम्यान सीसीटीव्हीत दोन व्यक्ती चेहऱ्याला रुमाल बांधून दुचाकीवरून प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जात असल्याचं समोर आलंय.
ठाण्यात नेमकं काय घडलं? (Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार झाला. गोळीबारामुळं पूर्णेकर जखमी झाल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मानपाडा या ठिकाणच्या त्यांच्या गणेश नगर येथील कार्यालयामध्ये हा प्राणघातक हल्ला झाला अशी माहिती आहे. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्रदीप पूर्णकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती मिळतेय. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला? हल्ल्यामागील कारण काय? आणि मारेकरी नेमके कोण होते होते याचा छडा लावण्याचं काम आता पोलिसांवर आलं आहे.























