त्रिपुरातून विमानाने मुंबईत यायचा, जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा आणि चोरी करुन विमानाने पळून जायचा
ठाणे क्राईम युनिट 5 (Thane Crime unit 5) च्या अधिकाऱ्यांनी ठाण्यात त्रिपुरातील चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून सोने, चांदी आणि पैसे जप्त केले आहेत.
Thane Crime News : गेल्या काही दिवसांपासूनठाणे शहरात चोरीच्या (Theft) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चोरांना पकडण्यासाठी ठाणे क्राईम युनिट 5 (Thane Crime unit 5) च्या अधिकाऱ्यांनी दोन पथके तयार केली होती. यामध्ये पोलिसांना एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी त्रिपुराचा (Tripura) असल्याची माहिती मिळाली आहे. हा आरोपी त्रिपुराहून विमानाने मुंबईत येत होता. तो मुंबईसह, ठाणे आणि पालघर परिसरात 15 दिवस रेकी करायचा. त्यानंतर बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा. चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा.
आरोपीकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त
ठाणे क्राईम युनिट 5 च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करुन त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या, अंधेरी, विलेपार्ले इथं झालेल्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सेलिब्रेटींसोबतच गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर, आणखी घटना उघड होऊ शकतात, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
ठाण्यात कोट्यवधींची चोरी, वसईमार्गे गाठलं राजस्थान; पोलिसांनी 100 सीसीटीव्ही तपासले, चोरट्याला माऊंट अबूच्या जंगलातून उचललं!