एक्स्प्लोर

ठाण्यात कोट्यवधींची चोरी, वसईमार्गे गाठलं राजस्थान; पोलिसांनी 100 सीसीटीव्ही तपासले, चोरट्याला माऊंट अबूच्या जंगलातून उचललं!

आरोपी माउंट अबूच्या जंगलात लपून बसल्याचे कळताच तपास अधिकारी भांगे आणि त्यांच्या टीमने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक कोटी 26 लाखांचे दागिने देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

ठाणे : मालकाच्या दुकानात दागिन्यांची चोरी करून फरार झालेल्या एका सेल्स बॉयच्या ठाणे पोलिसांनी (Thane Police)  मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आणि त्याला गजाआड केले. आरोपीने पकडले जाऊ (Thane Crime News)  नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली होती खरे परंतु पोलिसांनी  त्याला राजस्थानमधील माउंट अबू येथून अटक केली. 

ठाण्यातील नामवंत विरासत ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे मालक यशवंत पूनमिया यांनी आपल्या दुकानात तब्बल एक कोटी दहा हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नौपाडा पोलिसात केली. दुकानातील सेल्स बॉय म्हणून काम करणाऱ्या 29 वर्षे विशालसिंग राजपूत याने 11 मे रोजी दुकानातील तब्बल 1807.600 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. पोलिसांना आपला कोणताही पत्ता मिळू नये यासाठी आरोपी मोठ्या हुशारीने कार्यालयातील आधार कार्ड आणि इतर कागदपत्र घेऊन पळाला होता. पोलिसांनी जवळपास 100 सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर आरोपी तब्बल आठ ते दहा रिक्षा बदलून वसई येथे पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

तब्बल एक कोटी 26 लाखांचे दागिने जप्त

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल मुंबईकडे जाणार आहे का ट्रकमध्ये फेकून दिला होता. पोलिसाचा माघ काढत गुजरात आणि राजस्थानपर्यंत पोहोचली व त्यांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांना आपला थांब पत्ता लागू नये यासाठी आरोपी कोणत्याच लॉजमध्ये न राहता राजस्थानातील माउंट अबू येथील जंगलामध्ये वास्तव्य करून होता. दिवसा तो घनदाट जंगलात लपून राहत असे व झोप पूर्ण करण्यासाठी रात्री कोणत्याही बसने प्रवास करत असे.
अखेर दोन जून रोजी पोलिसांना आरोपी माउंट अबूच्या जंगलात लपून बसल्याचे कळताच तपास अधिकारी भांगे आणि त्यांच्या टीमने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक कोटी 26 लाखांचे दागिने देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

आरोपीला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली

न्यायालयात हजर केले असा न्यायालयाने या आरोपीला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. अशाप्रकारे पोलिसांना गुंगारा देऊन एवढी मोठी रक्कम घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. 

हे ही वाचा :

भुरट्या चोराने दोस्तांना दारुच्या पार्ट्या दिल्या, पोलिसांना टीप लागताच चक्रं फिरली, नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार मृत्यू प्रकरणाचं बिंग कसं फुटलं?

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Chandrapur Crime News: चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

Embed widget