एक्स्प्लोर

Thane Crime : पोलिसांनी ठाण्यातील रेव्ह पार्टी उधळली! एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई

31st Rave Party Police Action : ठाण्यात खाजगी प्लॉटमध्ये सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 100 जणांना ताब्यात घेतलं आहे.

Thane Crime News : देशात सर्वत्र थर्टी फर्स्ट (31st Celebration) आणि नवीन वर्षाचा जल्लोष (Happy New Year 2024) साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसोबतच (New Year Celebration) रेव्ह पार्ट्यांचंही (Rave Party) आयोजन करण्यात येतं. अशीच एक रेव्ह पार्टी ठाणे पोलिसांनी उघळून लावली आहे. ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या रेव्ह पार्टीत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असं असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली आहेत.

रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांची धडक कारवाई

थर्टी फर्स्टनिमित्त ठाण्यात ठाणे गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रेव्ह पार्टीतील सुमारे 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. 

एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते.

सुमारे 100 जणांवर कारवाई

ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच आणि युनिट दोन यांनी केलेल्या संयुक्तरित्या कारवाई रेव्ह पार्टीत सुमारे 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. रेव्ह पार्टीत ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून मेडिकलसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : 89 लाखांचा विमा घोटाळा! सात संशयित आरोपी आज भडगाव न्यायालयात हजर; सूरत कांडाशी कनेक्शनचा संशय?
89 लाखांचा विमा घोटाळा! सात संशयित आरोपी आज भडगाव न्यायालयात हजर; सूरत कांडाशी कनेक्शनचा संशय?
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Pune Court Firing News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
Bhandara News: शेतात रोटावेटर मारण्याचं काम सुरू असताना तोल गेला अन् आक्रीत घडलं; ट्रॅक्टरमध्ये चिरडून 11 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू; भंडाऱ्यातील हृदयद्रावक घटना
शेतात रोटावेटर मारण्याचं काम सुरू असताना तोल गेला अन् आक्रीत घडलं; ट्रॅक्टरमध्ये चिरडून 11 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू; भंडाऱ्याच्या सोरणा गावात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Embed widget