आधी शाळेत, नंतर शिकवणीवेळी घरातही बलात्कार; नराधम शिक्षकाचं विद्यार्थीनीसोबतच कुकर्म
पीडित विद्यार्थींनीबरोबर शाळा आणि क्लासमध्ये ही 5 महिने लैंगिक अत्याचार केल्याचं मुलीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
मुंबई : राज्यातील महिलांच्या सुरक्षेवरुन सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतात. मात्र, हे प्रश्न किंवा ह्या चर्चा तेवढ्याच वेळेपुरत्या मर्यादीत असतात असेच दिसून येते. कारण, महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. त्यातच, पोक्सो अंतर्गंत असलेले गुन्हे देखील राजरोजपणे घडत आहेत. आता, पुन्हा एकदा एका शालेय मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पूर्व येथील एका शाळेत 14 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच (Teacher) बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक (अमित दुबे) याला अटक (Crime news) केली आहे. त्याला वसई न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शाळेतील हा आरोपी शिक्षक हा मुलीची खासगी शिकवणी ही घ्यायचा, त्याने पीडित विद्यार्थींनीबरोबर शाळा आणि क्लासमध्ये ही 5 महिने लैंगिक अत्याचार केल्याचं मुलीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. मुलीसोबत घडलेला अत्याचारा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडिताच्या आईने पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर, पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. पेल्हार पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (एफ) 65 (1) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो)च्या कलम 4, 5. 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा
लॉटरी एकदाच लागत असते, नानाला कायदा प्रकियेचं ज्ञानच नाही; अशोक चव्हाणांचा थेट हल्लाबोल
आधी म्हैस, आता महागडी कार, गाडीचा नंबरही जोरदार;'गोल्ड'न बॉय अरशदला मरियम नवाज यांचं स्पेशल गिफ्ट