एक्स्प्लोर

धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला

छावणी परिसरातील संबंधि विद्यार्थी हा शाळेतील टीसी घेण्यासाठी आला होता, हा विद्यार्थी अल्पवयीन असून पूर्वीदेखील शाळेत असताना वर्ग शिक्षकांसोबत त्याचे वाद झाले होते.

संभाजीनगर : गेल्याच आठवड्यात चक्क मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे, येथील आरोपीने ऑनलाईन चाकू खरेदी केल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली. त्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगरमध्येही (sambhajinagar) अशीच धक्कादायक घटना घडली असून छावणी परिसरातील शाळेतील एका शिक्षकावर विद्यार्थ्यानेच चाकू हल्ला केल्याची माहिती आहे. चाकू हल्ला करणारा विद्यार्थी अल्पवयीन असून चाकू हल्ल्यानंतर शिक्षकास जखमी उपचारासाठी रुग्णालयात हलवलं आहे. तर, अकोल्यात (Akola) काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. 

छावणी परिसरातील संबंधि विद्यार्थी हा शाळेतील टीसी घेण्यासाठी आला होता, हा विद्यार्थी अल्पवयीन असून पूर्वीदेखील शाळेत असताना वर्ग शिक्षकांसोबत त्याचे वाद झाले होते. आजही टीसी घेण्यादरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर विद्यार्थ्याने थेट शिक्षकावर चाकूहल्ला केल्याने शाळेत खळबळ उडाली. विशाल धूशिंग असं शिक्षकाचे नाव असून शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्याने देखील चाकू ऑनलाइन मागवला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे, ऑनलाईन मिळणाऱ्या धारधार शस्त्रांचा मुद्दा समोर येत आहे. 

अकोल्यात काँग्रेस नगरसेवकाच्या पतीवर हल्ला

अकोल्यात काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर भर रस्त्यात जीवघेणा हल्ल्याची घटना घडली. अकोला महापालिकेच्या प्रभाग 17 च्या नगरसेविका 'रफिया बी' यांचे पती याकुब खान उर्फ याकुब पैलवान यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलसमोर गर्दी केली. तर, हल्लाखोर पळून जात असताना पोलिसांनी त्यास अटक केली आहे. दरम्यान, हा जीवघेणा हल्ला नेमकं कोणत्या कारणावरून झाला याची माहिती अद्याप कळू शकली नाही. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकाच्या पतिवर हल्ला झाल्याची घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget