सोलापूरात (Solapur) रात्री उशिरा बेकायदेशीर सुरु असलेल्या डान्सबारवर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकत कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई सोलापूरातल्या विजापूर रोडवरील गुलमोहर आर्केस्ट्रा बारवर करण्यात आली आहे. या बारमध्ये रात्री 3 वाजताच्या सुमारास नृत्यांगनांवर काही जण पैसे उधळत, यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या विशेष पथकाने छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात तळीरामांची गर्दी होती. पोलिसांना पाहताच पळापळी सुरू झाली. मात्र सर्व दरवाजे बंद असल्याने 49 लोकांना ताब्यात घेण्यात आले.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर आर्केस्ट्रा बारमध्ये रात्री तीन वाजता नृत्यांगनांवर काही जण पैसे उधळत असल्याचा प्रकार सुरू होता. यावेळी  गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत 49 लोकांना ताब्यात घेण्यात आले असून दोन लाख 71 हजार 380 रुपयांच्या रोख रकमेसह 59 लाख 78 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दरम्यान, या पूर्वीदेखील या ऑर्केस्ट्रा बार सोलापूर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पून्हा एकदा याच बारवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा ऑर्केस्ट्रा बार एका माजी पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगाच चालवत होता. या संपूर्ण प्रकरणात सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार मालक, बार चालक यांच्या सहित 49 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: