Paytm CEO Arrest : 'पेटीएम'चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीतील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कारला विजय शेखर शर्मा यांनी धडक दिली होती. विजय शेखर शर्मा यांना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा हे आपली जॅग्वार लँड रोव्हर कार भरधावपणे चालवत होते. त्यावेळी त्यांच्या कारने दक्षिण दिल्ली जिल्हा पोलीस आयुक्त बेनिता मेरी जयकार यांच्या कारला धडक दिली. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली असल्याचे नमूद करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मदर इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर झालेल्या घटनेनंतर विजय शर्मा यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
डीसीपी जयकर यांची कार त्यांचा चालक कॉन्स्टेबल दीपक कुमार चालवत होता. अपघातानंतर दीपक कुमारने वाहनाचा क्रमांक नोंदवून घेतला आणि याची माहिती डीसीपींना दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासानंतर, धडक देणारी कार ही गुरुग्राममधील एका कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे पोलिसांना समजले. ही कार विजय शर्मा यांच्याकडे असल्याची माहिती कंपनीच्यावतीने पोलिसांना देण्यात आली.
दिल्ली पोलीस प्रवक्त्या सुमन नलवा यांनी सांगितले की, विजय शर्मा यांना निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
पाहा: पेटीएमला श्रीमंत करणाऱ्या Vijay Shekhar Sharma यांच्या यशाची कहाणी
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट बँकेत नवी खाती उघडण्यावर RBI चे निर्बंध
- Paytm : आता रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्यासाठी देखील होणार पेटीएमचा उपयोग, असे करा बुकिंग