Latur Police Suicide News : लातूर जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 


किल्लारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी साहेब सावंत ( वय 38 )  यांनी मध्यरात्री स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. काही दिवसांपासून ते पैशांच्या देवाण-घेवाणीच्या मानसिक त्रासातून जात होते. त्यातूनच ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. साहेब सावंत हे कासार शिर्शी येथे असताना त्यांनी काही प्लॉट घेतले होते. यातून काही आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहारातून आर्थिक वाद निर्माण झाले असल्याचे म्हटले जात होते. सध्या त्यांची नेमणूक किल्लारी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. 


मध्यरात्री त्यांनी ठाण्यातील रायफलचा वापर करत आत्महत्या केली आहे. किल्लारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगले किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयत पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती सकाळच्या वेळी समजताच किल्लारी आणि परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. आत्महत्येपूर्वी काही चिठ्ठी लिहून ठेवण्यात आले आहेत. त्याची सत्यता पडताळणी सुरू असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. साहेब सावंत यांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha