UP Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौरच्या नजीबाबादमध्ये कॉलेजच्या बाहेर बुरखा घालून मुलींची छेडछाड करणाऱ्या एका तरुणाला लोकांनी पकडले. यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुरखा घातल्याने पोलीसही तरुणाला आधी मुलगी समजत होते. यानंतर त्याचा पुरुषी आवाज ऐकून बुरखा उतरवण्यात आला. तेव्हा बुरख्यात तरुण असल्याचे उघड झाले.


बिजनौर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुहेल असून तो नजीबाबाद येथील मोहल्ला पठाणपुरा येथील रहिवासी आहे, तो मागील तीन दिवसांपासून बुरखा, मास्क घालून सतत मुलींची छेड काढत होता. शनिवारीही त्याने बसमध्ये मुलींचा विनयभंग केला. यानंतर काही लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.


पोलीसही बुरख्यातील तरुणाला मुलगी समजले


पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसही बुरखा घातलेल्या तरुणालाही बराच काळ तरुणीच समजले. त्यामुळे महिला पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले, मात्र चौकीमध्ये चौकशी दरम्यान त्याचा आवाज पुरुषांचा होता. यानंतर ती मुलगी नसून बुरखा घातलेला मुलगा असल्याचे स्पष्ट झाले.


बुरखा काढण्यास तयार नव्हता तरुण
पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीला बुरखा काढण्यास सांगितते मात्र, तो बुरखा काढण्यास तयार नव्हता. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने त्याचा बुरखा काढला. बुरखा घातलेला हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून तरुणींची छेडछाड करत होता. बिजनौरचे पोलीस अधीक्षक डॉ. धरमवीर सिंह यांनी सांगितले की, 'पोलिसांनी आरोपी तरुणाला सध्या ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे. यामागे त्याचा हेतू काय आहे याचा तपास सुरु आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha