Power cut of agricultural pump : सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. एकीकडे खतांच्या वाढणाऱ्या किंमती, शेतमालाला मिळणारा कमी दर, अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका फटका बसत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या वीज तोडणीचं काम सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं संकटात सापडली आहे. आधीच रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे, तर दुसरीकडे आता फळबागांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. द्राक्ष, आंबा केळीच्या बागांना पाण्याची गरज असतानाच वीज कट करण्याचं काम सुरु आहे.
 
आतापर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांना फटका बसला हे. तसेच कांदा, गहू, मका, टोमॅटो या पिकांना देखील फटका बसला होता. सध्या द्राक्षांच्या बागांची काढणी होण्याची वेळ आली आहे. या काळात बागांना पाण्याची गरज असते मात्र, महावितरणकडून वीज तोडणीचे काम सुरु झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
 
यवर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाशी सामना करावा लागत आहे.  अवकाळीमुळे कायम द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाशी शेतकऱ्यांनी दोन हात केले पण सध्या मुबलक पाणी आणि वातावरण निवळले असताना गरजेच्या वेळी बागांना पाणी मिळत नाही. त्यामुळं शेतकरी हताश झाला आहे. द्राक्षाची तोडणी थांबवली तर द्राक्ष दर्जावर परिणाम होणार नाही तोडणी करुनही बागांना पाणी दिले नाही तर उत्पादनावर परिणाम होणार आहे.


दरम्यान, ऐन उन्हाळ्यात अडचणीतील शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन थकबाकीचे कारण पुढे करुन तोडले जात आहे. त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सविस्तर चर्चा देखील झाली होती. कृषी पंपाच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकरी देखील सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणीचा मुद्दा उपस्थित केला होता. या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं होत की, कृषी पंपाचे चालू बील भरलं तरी विजपुरवठा खंडीत केला जाणार नाही. मग आता वीज कनेक्शन का कट करत आहेत असा सवाल फडणवीस यांनी केला होता. वीज कट करणार नाही, अशी घोषणा करा असे ते म्हणाले. मंत्री महोदय दिशाभूल करत आहेत, हा चालूपणा चालणारं नाही असेही त्यांनी म्हटले होते.


महत्त्वाच्या बातम्या: