एक्स्प्लोर

Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...

Solapur Crime News: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Solapur Crime News: सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय 59) यांनी अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी हे गुरुवारी दुपारच्या सुमारास स्वतःच्या चारचाकी वाहनातून विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये आले होते. गाडी अपार्टमेंटच्या आवारात उभी करून त्यांनी पायऱ्यांच्या साहाय्याने थेट वरच्या मजल्याकडे प्रस्थान केले. काही वेळाने अपार्टमेंटच्या कठड्यावर एक व्यक्ती हात जोडून उभी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. सुरक्षारक्षकाने सदारंगानी यांना खाली आणले. मात्र, चावी वरच राहिल्याचा बहाणा करून ते पुन्हा वर गेले आणि काही क्षणांनी त्यांनी उडी घेतल्याची घटना घडली. 

Solapur Crime News: सुनील सदारंगानी यांचा जागीच मृत्यू

या संपूर्ण प्रकाराची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत सुनील सदारंगानी यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अपार्टमेंट परिसरात उभी असलेल्या चारचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. सुनील सदारंगानी हे चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत सोलापुरात आले होते आणि येथेच स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता. ते राजकुमार राठी यांचे जावई होते. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. घटनेची माहिती मिळताच अमेरिकेत असलेला मुलगा सोलापूरकडे रवाना झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Solapur Crime News: टोकाच्या निर्णयामागचे नेमके कारण काय?

एकेकाळी सोलापूर शहर व जिल्ह्यात मुलतानी बेकरीचे नाव सर्वदूर प्रसिद्ध होते. त्या काळात सुनील सदारंगानी यांचे संबंध अनेक नामवंत व्यक्तींशी होते. मात्र, काही वर्षांपूर्वी बेकरी बंद पडली आणि त्यानंतर ते पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्यास गेले. मागील काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसेच, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती नातेवाईक आणि परिचितांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, आत्महत्येसाठी त्यांनी पनाश अपार्टमेंटच का निवडले आणि या टोकाच्या निर्णयामागचे नेमके कारण काय, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

आणखी वाचा 

Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Pune Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget