पोलिसांना एक क्ल्यू मिळाला आणि चोरटे जाळ्यात आले, भिवंडीतील एटीएम फोडणाऱ्या टोळक्याला ठोकल्या बेड्या
Mumbai Crime News : 10 डिसेंबर रोजी टोळक्याने संधी साधून ऑक्सिजन सीलेंडरच्या मदतीने भिवंडीतील एटीएम फोडले होते. त्यातून तब्बल 26 लाख रूपयांची चोरी केली होती.
Mumbai Crime News : भिवंडीत एटीएम फोडणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. एटीएममध्ये चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. परंतु, दहा लिटरच्या गॅस कटरचा एक स्टीकर घटनास्थळी मिळाला आणि याच क्लूच्या आधारे पोलिसांनी सहा चोरट्यांना बेड्या ठोकल्या. या सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या शोधकार्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम 10 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने कापून तब्बल 26 लाख 4 हजार 500 रुपयांची चोरी केली होती. चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभे असताना त्याठिकाणी पोलिसांना गॅस कटरचा एक स्टीकर मिळाला. त्याच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने राजस्थान येथील कैथवाडा इथं पोहचून चोरट्यांना अटक केली. शराफत आजमत खान, इलियाज खान , गुलाम खान, शोएब खान, तौफिक अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
10 डिसेंबर रोजी या टोळक्याने संधी साधून ऑक्सिजन सीलेंडरच्या मदतीने एटीएम फोडले. त्यातून तब्बल 26 लाख रूपयांची चोरी केली. याची माहिती आसपासच्या लोकांना मिळताच त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पैसे घेऊन पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. कारण घटनास्थळी काहीच आढळून येत नव्हते. तपास सुरू असतानाच घटनास्थळी एटीएम तोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या गॅस कटरचे स्टीकर मिळाले. त्याच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि यातूनच आरोपींचे धागेदोरे हाती लागले.
पोलिसांनी मिलालेल्या स्टीकरच्या आधारे कसून तपास केल्यानंतर तो कटर मुंब्रा येथील एका खासगी संस्थेतून घेतल्याची माहिती मिळाली. ही संस्था गरजू आजारी लोकांची सेवा करते. पोलिसांनी सिलेंडर घेणाऱ्या व्यक्तीबाबत तपास केला त्यावेळी त्यांना समजले की सर्व संशयित हे राजस्थानला पळून गेले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक राजस्थानला पोहोचले. तेथून त्यांनी एटीएम फोडणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या सहा जणांनी चोरीची कबूली दिली.
महत्वाच्या बातम्या
मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई! तब्बल 80 लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त