मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
Kandivali Crime : कांदिवली येथील एका नाल्यात 10 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोणीत भरून फेकून देण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kandivali Crime : मुंबईमध्ये (Mumbai Crime) घडलेल्या घटनेनं सर्वांना हादरवून ठेवलंय. कांदिवली पश्चिमेत (Kandivali West) एका नाल्यात 10 भटक्या कुत्र्यांचे (Stray Dogs) मृतदेह गोणीत भरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कांदिवली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, कांदिवली पश्चिममध्ये साईनगर परिसरातील एका नाल्यात शनिवारी काही पोती स्थानिकांना आढळून आली. स्थानिकांकडून याची माहिती कांदिवली पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कांदिवली येथील एका नाल्यात 10 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोणीत भरून फेकून देण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईनगर परिसरातील एका नाल्यात शनिवारी काही पोती स्थानिकांना आढळून आली. स्थानिकांकडून याची माहिती कांदिवली पोलिसांना देण्यात आली. कांदिवली पोलिसांनी तपास केला असता, या गोण्यांमध्ये 10 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह सापडले. स्थानिकांच्या तक्रारीच्या आधारे कांदिवली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यातील तरतुदींनुसार, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या सर्व भटक्या कुत्र्यांची कोणी हत्या केली? या संदर्भात आता कांदिवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
कांदिवली पश्चिमेत साईनगर परिसरातील एका नाल्यात शनिवारी काही पोती आढळून आली. स्थानिकांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोत्यांची पाहणी केली. त्यावेळी त्या पोत्यांमध्ये 10 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत प्राण्यांबाबत क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, प्राण्यांसोबत संबंध ठेवून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्याही अनेक घटना जगभरातून समोर आल्या आहेत. कुत्रे, कुत्र्यांची पिल्लं आणि मांजर यांना जिवंत जाळण्यात आल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :