Satara: धक्कादायक! साताऱ्यात सातवीतील मुलगी चार महिन्यांची गरोदर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल
Satara News: शाळेतील एका नववीमधील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला.
Satara News : सातारा : सातारा (Satara News) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलीवर नववीतील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता. मासिक पाळी नियमित न आल्याने तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साताऱ्यामध्ये खेळण्या बागडण्याच्या वयात अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर रहिली आहे. शाळेतील एका नववीमधील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला. शाळकरी मुलीने झालेला प्रकार या त्यावेळी कोणालाच सांगितला नव्हता. शाळकरी मुलीच्या मासिक पाळीवरुन तिची तपासणी सुरू असताना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरुन तिची सोनोग्राफी करण्यात आली आणि हा सर्व प्रकार समोर आला.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
याबाबत तिच्या आईने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबधित शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. या घटनेतील संबधित मुलीला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला
शाळकरी मुलीची पाळी नियमित न आल्याने आई तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली. यावेळी डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी केल्यानंतर पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर लादले मातृत्व
नागपूर जिल्ह्यात 12 वर्षांच्या मुलीचा विवाह एका मुलासोबत लावून दिला. त्यावेळी मुलीचे वय अवघे 12 वर्षाचे होते. लग्नानंतर पीडित बालिका ही चार महिन्यांची गरोदर झाली. मुलीची तब्येत बिघडल्याने आईने चार महिन्यांच्या आपल्या गरोदर मुलीला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेले, यावेळी डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत याविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी पिडीतचे आई आणि नागपूर जिल्हातील पतीविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो, बलात्कार आदी कलमाअन्वये गुन्हे दाखल केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :