Satara Crime News: आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
Satara Crime News: साताऱ्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satara Crime News सातारा: साताऱ्यातील एक धक्कादायक घटना (Satara Crime News) समोर आली आहे. आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्याच्या वादातून युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत घेऊन तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाठलाग करून संतप्त जमावाने नागेवाडी हद्दीत कार अडवली. त्यानंतर कारची तोडफोड करत कारमधील दोघांना चांगलाच चोप देण्यात आला. सातारा तालुका आणि भुईंज पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला असून दोन्ही संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.
नेमकं काय घडलं? (Satara Latest News)
सातारा येथील आनेवाडी टोलनाक्याजवळ किरकोळ वादातून घडलेल्या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कट मारण्याच्या वादातून कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला कारच्या दारात घेऊन तब्बल तीन किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त जमावाने कारचा पाठलाग करत नागेवाडी हद्दीत कार अडवली.
कारमधील दोन्ही संशयितांना घेतलं ताब्यात- (Satara Crime News)
युवकाची सुटका केल्यानंतर जमावाने कारची तोडफोड केली आणि कारमधील दोघांना चोप दिला. दरम्यान, सातारा तालुका आणि भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कारमधील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून हाणामारी- (Pune Latest Marathi News)
मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून दोन वाहनचालकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. ओव्हरटेक करताना वाहनाला धक्का लागल्याने वादाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काहींनी मध्यस्ती केल्यानं वाद निवळला. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर ही आली. पण वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा संयम सुटू लागलाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शिव्यांच्या लाखोलीत रंगला ‘बोरीचा बार’; सुखेड-बोरीच्या 300 महिलांनी जपली शेकडो वर्षांची परंपरा (Satara News)
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात रंगला बोरी आणि सुखेड गावातील महिलांचा बोरीचा बार,अनोखी प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्यातून नागरिकांची उपस्थिती ढोल, ताशा, शिंग आणि तुतारीच्या गजरात हातवारे, टाळ्यांचा कडकडाट आणि एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहत सुखेड आणि बोरी गावातील सुमारे तीनशे महिलांनी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक ‘बोरीचा बार’ घालत अनोखी परंपरा यंदाही उत्साहात जपली. वातावरण दणाणून गेले होते. सुमारे पाऊण तास रंगलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुखेड व बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजल्यानंतर दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकींना हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहतात. पिढ्यान्पिढ्या सुरू असलेली ही अनोखी परंपरा यंदाही कायम राहिल्याने दोन्ही गावांतील महिलांमध्ये मोठा उत्साह होता.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:





















