Jitendra Awhad : खा. बजरंग सोनवण्यांच्या खुलास्यात तथ्य; वाल्मिक कराडवरुन जितेंद्र आव्हाडांचं थेट मंत्र्यांकडे बोट
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी खुलासा केलाय. यात तथ्य असल्याची खात्री झाली आहे. अशी प्रतिक्रिया देत इलेक्शन फंडसाठी संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ठाणे : मी मुंबईत कॉलेजमध्ये असल्यापासून अनेक गोष्टी बघितल्या. दगडीचाळ असो किंवा इतर अनेक भागातील गुंड मी बघितले. मात्र मुंबई पोलिसांपुढे काय कुणाची हिंमत. त्या काळात दाऊदला कॉलर पकडून भेंडी बाजारमधून खेचून आणायचे. पोलीस हेच सर्वात मोठे दादा असतात, त्यांच्यापुढे कोणीही नाही. असं आमचा समज होता कालपर्यंत. मात्र आज परिस्थिती वेगळी असून वाल्मिकी कराड हा दाऊद, छोटा राजन, अमर नाईक यापेक्षा कोणी मोठा लागून गेला आहे. स्वतः चालत पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. जेव्हा की ते बापू आंधळे यांच्या हत्येच्या कटात 307 चा आरोपी आहे. पोलिसांना हे माहिती नव्हतं का?
आरोपींना आपल्या महाराष्ट्रात अशी वागणूक देणार आहात का? किंबहुना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल एक खुलासा केलाय. यात तथ्य असल्याची खात्री झाली आहे. अशी प्रतिक्रिया देत इलेक्शन फंडसाठी संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केला आहे.
.... मात्र या प्रकरणात पोलीस बिळात होते- जितेंद्र आव्हाड
अजित पवार बीडला गेले असताना शिवलिंग मोराळे होता, ही गाडी अजित पवार यांच्या ताफ्यामध्ये होती. याच गाडीतुन वाल्मिक कराड याला सोडलं. या प्रकरणामुळे पोलिसांची नाचक्की पूर्ण देशात झाली आहे. पोलिसांच्या भाषेत शरण आला यात काही अर्थ नाही. पकडून आणणे महत्वाचं असतं. पोलीस बिळातून शोधून आणत असतात. मात्र या प्रकरणात पोलीस बिळात होते, अशी टीका ही आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी केली आहे.
सोमनाथ सुर्यवंशी संदर्भात आज ही कोणी बोलायला तयार नाही. हा मर्डर आहे हे कोणीही बोलायला तयार नाही. श्वासोश्वासाने तो मेलेला नाही. हे प्रकरण दडपण्याच्या दिशेने जात आहे. पत्रकार यांच्या मागे काही विशेष लोक फिरत आहेत. मी ही वंजारी आहे, मात्र शितावरून भाताची परिक्षा करु नका. राज्यात 40 हून अधिक आयएस आणि आयपीएस अधिकारी वंजारी समाजाचे असून चांगलं काम करत आहेत. आता धर्माविरुन ते जातीवर आले, त्यानंतर ते पोटजातीवर जातील त्यानंतर भाषेवर जातील असेही ते म्हणाले.
मुंबईच्या डॉनलोकांपेक्षा कराडची जास्त चलती
मला कराडचं कौतुक याच्यासाठी वाटतं की, मी हे सगळं 1989 सालापासून बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू देशी, अरुण गवळी ही मुंबईतली मोठी नावं आहेत. त्यांची एवढी चालत नाही, एवढी ह्या कराडची चालत आहे. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. अशी दादागिरी कोणाची चालली नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या बाहेर दारातच आला. मुंबईमधल्या मोठ्या गँगवारला आख्खी मुंबईची इंडस्ट्रीयल लॉबी घाबरायची. मुंबईच्या पोलिसांवर ते घाबरायचे, पोलीस त्यांना पकडून घेऊन यायचे. एवढी पोलिसांची दादागिरी होती. पण, वाल्मिक कराडची पोलिसांपेक्षा जास्त दादागिरी दिसून आली, असेही आव्हाड यांनी म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या