Sangli Crime News : सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला पीडित पालकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला आहे. सांगली शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत शाळेतील एका शिक्षकाने अश्लील चाळे केले होते. विद्यार्थीनीने घाबरून तिच्या सोबत घडलेला हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला. त्या वेळी अन्य विद्यार्थीनींसोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले.
या प्रकरणी पीडित पालकांनी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहचले. अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत झालेल्या प्रकारचा जाब विचारला त्यावेळी पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगलाच चोप दिला. झालेला प्रकार हा अतिशय निंदनिय आहे. पालक आणि विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत. अशा विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरत आहेत. जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही तोवर आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. या वेळी त्या विकृत शिक्षकाला तत्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या विकृत शिक्षकास नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मनसे महिला आघाडीच्या सरोजा लोहगावे, जमीर सनदी, दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, संजय खोत, प्रकाश माळी, अमर औरादे, अनिकेत कुंभार, रोहित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजीनगर हादरलं! कॉफी कॅफेमध्येच अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अभ्यासिकेत ओळख झालेल्या मित्राकडूनच कॉफी कॅफेमध्ये (Coffee Cafe) नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) करण्यात आल्याच्या घटनेने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहर हादरले आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कॉफी कॅफेमध्ये अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून, सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. नितीन वाघ असे आरोपीचे नाव आहे.