PM Kisan Tractor Yojana 2024 : सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात, यादरम्यान काही बनावट योजनांची (Fake Scheme) माहितीही व्हायरल (Viral) होत असतात. अशीच एक चर्चित योजनाe म्हणजे पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेबाबत (PM Kisan Tractor Yojana 2024) सविस्तर माहिती जाणून घ्या. इंटरनेटवर पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट (PM Kisan Tractor Yojana 2024 Website) आहे, यावर दावा केला जात आहे की, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत (PM Kisan Tractor Yojana 2024 Application) पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर (Tractor) खरेदीसाठी सरकारकडून (Central Government) 50 टक्के सबसिडी दिली जाईल.


पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना 


पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 50 टक्के सबसिडी देण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीला ट्रॅक्टर उपलब्ध होणार असल्याचंही सांगितलं जातं आहे. वेबसाईटवर या संदर्भात माहितीही उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या व्हायरल योजनेबाबत सविस्तर आणि खरी माहिती देणार आहोत.


ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 50 टक्के सबसिडी?


पीएम किसान टॅक्टर योजने अंतर्गत 50 टक्के अनुदान मिळत असल्याने अनेक जण या योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्हालाही सोशल मीडिया, पोस्ट किंवा इतर काही माध्यमातून या संदर्भात माहिती मिळाली असेल आणि तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर, याबाबत सत्यता पडताळून घ्या.


अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचाय? सरकारची योजना काय? 


पीआयबी फॅक्ट चेकमध्ये या योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीआयबी फॅक्टचेकनुसार, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकारी योजना नाही. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट इंटरनेटवर आहे. पण, ही वेबसाईट आणि योजना सरकारकडून राबवण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजना एक बनावट योजना असून केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना राबवण्यात येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही वेबसाईट आणि योजना बनावट आहे.






'या' योजनेसाठी अर्ज करु नका


तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू नका, कारण ही योजना बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे. अनेक योजनांची मदत घेऊन अनेक फसवणूक करणारे पीएम किसानच्या नावाने अनेक वेबसाइट्स चालवत आहेत. त्यामुळे अशा बनावट वेबसाइट्सपासून दूर राहा आणि चुकूनही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी जारी केलेल्या बनावट वेबसाइटवर अर्ज करू नका. 


बनावट योजनांपासून सावध राहा


तुम्हाला बनावट योजनांपासून सावध राहण्याची गरज आहे. सध्या इंटरनेटवर बनावट योजनांच्या अनेक बनावट वेबसाइट उपलब्ध आहेत. आतापर्यंत अनेक बनावट योजनांच्या वेबसाइट्स बंदही करण्यात आल्या आहेत. पण तरीही, सध्या अनेक वेबसाइट्स अस्तित्वात आहेत, त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला संबंधित विभागाकडून त्या योजनेशी संबंधित माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. बनावट योजनांपासून सावध राहा.