Karan Johar : करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहे. अनेक बिग बजेट सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मिती त्याने केली आहे. पण तो त्याच्या साधारण सिनेमांच्या प्रमोशनसाठी पीआरला लाच देतो असं म्हणत नेटकऱ्यांनी बॉलिवूड कॉन्ट्रोवर्सीवर भाष्य केलं आहे.
करण जोहर वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. बऱ्याचदा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जातं. पण करण ट्रोलर्स मंडळींना उत्तर देत त्यांचं बोलणं बंद करतो. बॉलिवूड कॉन्ट्रोवर्सीमुळे करणला ट्रोल केलं जातं.
करण जोहरने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं आहे की,"एकादा सिनेमा रिलीज झाला ती त्याबद्दल होणाऱ्या नकारात्मकतेबद्दल मला खूप वाईट वाटतं. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी फॅन क्लब विविध प्रयत्न करत असतात. प्रेक्षकांपर्यंत एक चांगला सिनेमा पोहोचवण्याचा माझा मानस आहे".
प्रत्येक सिनेमा मला काहीतरी शिकवतो : करण जोहर
करण जोहर पुढे म्हणाला,"वाईट प्रतिक्रियांमुळे चांगले सिनेमे पाहायचे प्रेक्षकांचे राहून जातात. पण सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी ही मंडळी विविध प्रयत्न करत असतात. दुसरीकडे आम्हीदेखील पीआरच्या माध्यमातून आमच्या सिनेमाचं चांगलं प्रमोशन करतो. त्यामुळे सकारात्मक प्रतिक्रिया मिळतात. सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. माझा प्रत्येक सिनेमा मला काहीतरी शिकवतो".
करण जोहरचा 'योद्धा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Karan Johar Upcoming Movie)
करण जोहरचा आगामी 'योद्धा' (Yodha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. करणचा हा बिग बजेट सिनेमा असून यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. हा अॅक्शन सिनेमा असून यात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पाटनी आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
करण जोहरबद्दल जाणून घ्या... (Who is Karan Johar)
करण जोहर हा बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माता आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरने सांभाळली आहे. त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कल होना हो, कभी अलविदा ना कहना, दोस्ताना, डियर जिंदगी, अशा अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरने सांभळली आहे.
संंबंधित बातम्या