एक्स्प्लोर

Sandeep Gill On Bhigwan Kidnapping Case: घटनाक्रम वेगळा, दोघांच्या स्टेटमेंट्समध्येही तफावत...भिगवणमधील तरुणी आईसमोर आल्यानंतर काय घडलं?, संदीप गिल यांची A टू Z माहिती

Sandeep Gill On Bhigwan Kidnapping Case: आज दुपारी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन भिगवण अपहरण घटनेची सविस्तर माहिती दिली.

Sandeep Gill On Bhigwan Kidnapping Case: इंदापुरमधील भिगवण भागातील घटनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहे. भिगवनमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र हे सगळं खोटं असल्याचं तरुणीने स्पष्ट केलं आहे. संबंधित तरुणीने जबरदस्तीने नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे स्पष्ट केले. तसेच काल मध्यरात्री 1.30 वाजता बारामती पोलीस स्थानकात देखील संबंधित तरुणी उपस्थित राहिली. त्यानंतर आज दुपारी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन भिगवण अपहरण घटनेची सविस्तर माहिती दिली. (Sandeep Gill On Bhigwan Kidnapping Case)

सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणही ऐकून घेतलं आहे. त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपलं म्हणणं मांडलं आहे. मात्र तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्याने आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत. संबंधित तरुणीने कोर्टासमोरही तिचं सगळं म्हणणं मांडलं आहे. दोघांचेही स्टेटमेंट्स , घटनाक्रम जो सांगितला तो वेगळा आहे. सगळ्यामध्ये तफावत आहे. त्यामुळे आम्ही सखोल तपास करत आहोत. आई आणि मुलीची भेट झाली आहे. त्यांनी आपापसात संवादही केला. मात्र मुलीने तिच्या आईकडे जाण्यास नकार दिला, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली. (Sandeep Gill On Bhigwan Kidnapping Case)

मुलीचा मित्र सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी- (Bhigwan Kidnapping Case)

मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर आता विविध खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी साडेपाच वाजता मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेले आहेत. मुलीच्या मित्राला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तरुणीने प्रतिज्ञापत्रात काय काय म्हटलंय? (Bhigwan Kidnapping Case)

संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असं म्हटलं आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. सोशल मिडीयावरून मला कळाले की, माझ्या आईने मला जबरदस्तीने माझ्या आईवर त्यांच्या हातातील लाकडी दांडके उगारून तसेच माझ्या आई व भाऊ यांच्या डोळयात मिरचीची पुड टाकून माझे अपहरण केले आहे तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी हिसकावून नेली आहे अशी खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे. सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून व कोणाच्यातरी दबावावरून खोटी व बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जीने 1 वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने निघून गेली होती. मी पुर्णपणे सज्ञान असलेने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. 

भिगवण अपहरण प्रकरण बोगस, पुणे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगतिला, VIDEO:

संबंधित बातमी:

Bhigwan Kidnapping Case: माझं आणि त्याचं प्रेम, मी घरी सांगितलेलं...नेमकं काय घडलेलं?, अपहरण झालेल्या तरुणीने प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलं!

Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलीस ठाण्यात, पळून गेल्यानंतर कुठे कुठे लपले अन् फिरले तपशील समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget