ग्यारा मुल्कों की पुलिस जिसको ढूंढ रही है, ती White Widow नेमकी आहे तरी कोण?
World Crime News: इंटरपोलच्या मोस्ट वॉन्टेड लोकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या महिलेवर शेकडो लोकांच्या मृत्यूचा आरोप आहे. तिच्या पतीनंही मोठ्या प्रमाणात लोकांची हत्या केली आहे.
White Widow Samantha Lewthwaite: एक महिला, जिचा शोध संपूर्ण जगभरात सुरू आहे. पण, अजून तिच्याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की, या बाईचा अख्ख्या जगात शोध का सुरूये? याचं कारण ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. महिला संपूर्ण जगासाठी घातक आहे. हो, हो, घातक. तिची कहाणी ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. जगभरात या महिलेला 'White Widow' म्हणून ओळखतात. या महिलेचं नाव सामन्था लेव्हथवेट (Samantha Lewthwaite) असून 39 वर्षांची आहे. तर व्हाईट विडोचा पती 7/7 बॉम्बर होता.
7 जुलै 2005 रोजी लंडनमध्ये चार आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला उडवलं. त्यापैकी एक होता लेव्हथवेटचा नवरा. या हल्ल्यांना 7/7 असंही म्हणतात. या महिलेवर 400 हून अधिक लोकांच्या मृत्यूचा आरोप आहे. इंटरपोलच्या रेड लिस्टमध्ये तो टॉपवर आहे. तिच्या माजी पती जर्मेन लिंडसेनं केलेल्या हल्ल्यात 56 लोक मारले गेले आणि 784 लोक जखमी झाले आहेत.
2012 मध्येच व्हाईट विडोविरोधात अटक वॉरंट जारी
2012 मध्ये केनिया पोलिसांनी व्हाईट विडोविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर तिनं तिथून पळ काढला आणि ती दक्षिण आफ्रिकेचा पासपोर्ट आणि नताली फेय हे बनावट नाव वापरत होती. केनिया पोलिसांनी व्हाईट विडोच्या अटकेसाठी ब्रिटीश पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी नताली नावाची ही महिलाच प्रत्यक्षात लेव्हथवेट असल्याचं समोर आलं होतं. व्हाईट विडोला चार मुलं असून ती नंतर ब्रिटनमधून फरार झाली होती. अल-शबाब दहशतवादी सेलच्या केनियामध्ये हल्ले करण्याच्या प्लॅनिंगमध्ये व्हाईट विडोचा सहभाग होता.
व्हाईट विडोविरोधात इंटरपोलची रेड नोटीस
केनियातील मोम्बासा येथील बारवर झालेल्या हल्ल्यात लेव्हथवेट ही प्रमुख संशयितांपैकी एक होती आणि नैरोबी शॉपिंग मॉल हल्ल्याशीही तिचा संबंध असल्याचं तपासातून समोर आलं होतं. नैरोबी शॉपिंग मॉलमधील हल्ल्यात 71 लोक मारले गेले होते. तिला फरार होऊन 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. इंटरपोल अजूनही त्याचा शोध घेत आहे. इंटरपोलच्या रेड नोटीसमध्ये, व्हाईट विडोचं वर्णन जघन्य गुन्ह्याचा कट रचणारी आणि स्फोटकं बाळगल्याबद्दल वाँटेड म्हणून करण्यात आलं आहे.
कोण आहे व्हाईट विडो?
लेव्हथवेटचा जन्म उत्तर आयर्लंडमधील काउंटी डाऊन येथे झाला आणि वयाच्या 17 व्या वर्षी तिनं इस्लाम धर्म स्वीकारला. लेव्हथवेट खूप लहान असतानाच तिचे पालक वेगळे झाले. या घटनेचा लेव्हथवेटच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम झाला. पुढे जाऊन लेव्हथवेटनं गुन्हेगारीची मार्ग स्विकारला. जगभरात अनेक शहरांमध्ये लेव्हथवेटचे वॉन्टेड म्हणून पोस्टर्स लावण्यात आले आहेत. व्हाईट विडो कुठेही, कधीही, कोणालाही दिसली, तरी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.