गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, दहा दिवसात आठ जणांची हत्या
Nagpur News नागपूर: उपराजधानी नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या (Nagpur Crime News) झाली आहे.Nagpur News नागपूर: उपराजधानी नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या (Nagpur Crime News) झाली आहे.
Nagpur News नागपूर: उपराजधानी नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या (Nagpur Crime News) झाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा (Police) धाक उरलेला नाही का? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उपराजधानी नागपूर शहरात (Nagpur Crime News) एकापाठोपाठ एक हत्यांचे (Nagpur Crime News)सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील पाच दिवसांत चार खुनाच्या घटनेने नागपूर शहर हादरले होते. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या झाली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी (Crime News) विश्वात कायदा आणि पोलिसांचा (Nagpur Police) धाक संपला आहे का, असा प्रश्न या उपस्थित झाला आहे.
24 तासांत 4 जणांचा खून-
गेल्या 48 तासात नागपुरातील नंदनवन आणि कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपुरात एक फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान हत्या झालेल्यांची संख्या आठ झाली आहे.
1) नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशपांडे लेआउट मध्ये उसने दिलेले पैसे परत मागितले या रागातून दोन आरोपींनी नीरज भोयर या तरुणाच्या डोक्यावर फरशीने वार करून त्याची हत्या केली.तर नीरजच्या मित्राला गंभीर जखमी केले होते. जखमी विशाल राऊत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
2) दुसरी घटना ही नंदनवन पोलीस स्टेशनचे हद्दीत घडली असून सचिन उईके या ट्रकचालकाचा दर्शन भोंडेकर या ट्रक मालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.. सचिन उईके कामावर येत नाही म्हणून ट्रक मालकाने त्याला जाब विचारला. तेव्हा दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत सचिन उईके या ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दर्शन भोंडेकर या ट्रक चालकाला अटक केली आहे.
3) तिसरी घटना कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत गुलमोहर नगरात काल संध्याकाळी घडली. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून अज्जू शेख नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अज्जू शेख आणि करण व इतर तरुण गुलमोहर नगरात क्रिकेट खेळत असताना अज्जू शेख आणि करण या दोघांचा वाद झाला, थोड्या वेळा नंतर करण ने अज्जू वर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.
नवीन पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध हत्येच्या घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे. या निमित्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा परत एकदा चर्चेला आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नागपुरात एका नंतर एक हत्येच्या चार घटना घडल्या होत्या. त्यानंतर मागील दोन दिवसांत चार जणांची हत्या झाली. त्यामुळे फेब्रुवारीच्या दहा दिवसात हत्येच्या 8 घटना घडल्याने नागपूरात काय सुरु आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आणखी वाचा :
Nagpur Crime News : नागपुरात कायदा सुव्यवस्था ऐरणीवर, 48 तासांत तिघांची हत्या : ABP Majha