एक्स्प्लोर

Raigad Crime News : रायगडमध्ये खळबळ! रोह्यातील घरात आढळला मोठा शस्त्रसाठा, पोलिसांकडून एकाला अटक

Raigad News: सोमवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली.

Raigad Crime News :  रायगड जिल्ह्यातील (Raigad) रोहा शहरात (Roha) सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई केली. एका घरातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी चॉपर, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे. रायगड पोलिसांनी (Raigad Police) या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 

सोमवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. शहरातील धनगर आळी येथील रहिवासी तन्मय सतीश भोकटे (वय 24)  याच्या राहत्या घरात पोलिसांनी  मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक बनवण्याचे साहित्य, एक रिवॉल्वर, 5 बंदूक, 39  काडतूस, तीन तलवारी, 5 लोखंडी काती, एक चॉपर,  5 चाकू, कोयता, 24 दारूगोळाची  पाकिटे, शिशाचे छोटे बॉल त्याचबरोबर वन्य प्राण्यांचे अवशेष त्यामध्ये जनावरांचे शिंग, भेकराचे 14 जोड, सांबर 5 जोड, काळवीट 1 जोड, चौसिंगा 2 जोड यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य घरामध्ये सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडालीय. 

आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

अमरावतीमध्येही शस्त्रसाठा जप्त

मागील महिन्यात, अमरावतीमध्ये 11 डिसेंबर रोजी पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त केला होता. अमरावती शहरात अवैध घातक शस्त्रे विक्री करणार्‍या 6 जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले. मुंबईहून शस्त्रे आणून अमरावती शहरात विक्री करण्यात येत होती, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना चौकशी दरम्यान दिली. 

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अब्दुल सोहेल अब्दुल शफी (वय 19 वर्ष, रा. गुलीस्ता नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे 1 खंजर आणि 2 चायना चाकू मिळाले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डु वल्द बादुल्ला खान (वय 19 वर्ष, रा. अलीम नगर), टोळी सदस्य फरदीन खान युसुफ खान (वय 21 वर्ष, रा.राहुल नगर), मुजम्मील खान जफर खान (वय 21 वर्ष, रा.गुलीस्ता नगर), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (वय 19 वर्ष, रा. यास्मीन नगर), जाहेद शहा हमीद शहा (वय 20 वर्ष, रा. लालखडी) असे सहा जणांना अटक करण्यात आली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget