Tiger Skin Case : गाईला विष देऊन वाघीणीच्या तोंडी दिलं, शिकाऱ्यांनी डाव साधला; पुणे सीमा शुल्क विभागाने केली वाघाची 5 कोटींची कातडी जप्त
Pune Tiger Poaching Case : वाघाची कातडी विकणारं आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त झालं असून या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
![Tiger Skin Case : गाईला विष देऊन वाघीणीच्या तोंडी दिलं, शिकाऱ्यांनी डाव साधला; पुणे सीमा शुल्क विभागाने केली वाघाची 5 कोटींची कातडी जप्त Pune tiger poaching skin smuggling gang International racket arrested Customs Department action in jalgaon marathi news Tiger Skin Case : गाईला विष देऊन वाघीणीच्या तोंडी दिलं, शिकाऱ्यांनी डाव साधला; पुणे सीमा शुल्क विभागाने केली वाघाची 5 कोटींची कातडी जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/4a93e756cb5161e9a3c3334d4eb0a821172224788570593_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : वाघांची शिकार करून कातडी विकणार मोठं रॅकेट (Pune Tiger Poaching Case) केलं पुण्यात उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. पुणे सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.
वाघाची कातडी विकणारा एक ग्रुप जळगाव जवळ आल्याची माहिती नागपूर सीमा शुल्क विभागाने पुणे सीमा शुल्क विभागाला दिली. त्याचा तपास करण्यासाठी 26 तारखेला पुण्यातून पथक निघालं. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत सीमा शुल्क विभागाने सहा जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. रहीम रफिक हा या टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती आहे.
पाच फूट वाघीणीचे कातडे जप्त
ताब्यात घेण्यात आलेली कातडी ही पाच फूट लांब असणाऱ्या वाघीणीची असल्याची माहिती आहे. ही वाघीण चार ते पाच वर्षांची असल्याचं सांगितलं जातंय. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी असल्याचं सांगितलं जातंय. सीमा शुल्क विभागाने या प्रकरणी Wildlife (Protection) Act, 1972 कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
गाईला विष देऊन वाघाच्या तोंडी दिलं
या तस्करांनी एका वनगाईला विष देऊन ठार मारलं आणि ती गाय वाघाच्या तोंडी दिली. ती गाय वाघाने खाल्ल्याने वाघाचा त्यामध्ये मृत्यू झाल्याचं तपासातून उघडकीस आलं आहे.
आंतरराष्ट्रीय संबंध तपासण्याचे काम सुरू
अटक करण्यात आलेल्यांपैकी रहीम खानची चौकशी केल्यानंतर त्याला यापूर्वी देखील फॉरेस्ट डिपार्टमेंटने अटक केली होती अशी माहिती समोर आली. तर मोहम्मद आशर खान हा भोपाळचा रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जळगावात सापडलेल्या या प्रकरणाता भोपाळ आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संबंध आहे का याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
पुणे सीमा शुल्क या प्रकरणी अधिकचा तपास करत असून यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे, कोणतं रॅकेट कार्यरत आहे याची माहिती घेत आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)