(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : आलीशान गाडी, अंगावर लाखोंचं सोनं, लखपती गोल्डमॅनला पोलिसांनी दाखवला इंगा; भर रस्त्यात पाहा काय घडलं?
पुण्यातील सांगवी पोलिसांनी गोल्डमॅनवर मोठी कारवाई केली आहे.
पुणे : कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. पण कधीकधी समोरची व्यक्ती बघून कायद्याची अंमलबजावणी करणारी व्यक्ती कायद्याला दुय्यम मानते. एखादी श्रीमंत, प्रतिष्ठित व्यक्ती समोर दिसल्यास कायदा बाजूला ठेवून त्या व्यक्तीला अभय दिले जाते. आपल्याकडे वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. पण कधीकधी याच नियमांना फाट्यावर अनेकदा फाट्यावर मारलं जातं. तशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. सध्या पोलिसांनी एका गोल्डमॅनला (Pune Golman) दाखवलेल्या पोलिसी खाक्याची चांगलीच चर्चा होता. अंगार लाखो रुपयांचं असलेल्या या गोल्डमॅनला (Goldman Viral Video) कायद्यासमोर झुकावं लागलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एका गोल्डमॅनला पोलिसांनी दंड ठोववला आहे. पुण्यातील सांगवी पोलिसांनीकेलेल्या या कारवाईचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या गोल्डमॅनने आपल्या कारच्या काचेला काळ्या रंगाची फिल्मिंग केली होती. कायद्यानुसार गाडीच्या काचांना अशा प्रकारे रंगवणे गुन्हा आहे. मग काय सांगवी पोलिसांनी या गोल्डमॅनला कायदा काय असतो, हे सांगितलं आहे. या गोल्ड मॅनला पोलिसांनी थेट तीन हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.
पोलिसांनी गोल्डमॅनवर अशा प्रकारे कारवाई केली, पाहा व्हिडीओ :
गोल्डमॅनला दाखवला पोलिसी खाक्या
व्हिडीओतील गोल्डमॅनकडे ऑडी ही महागडी कार आहे. त्याच्या कारला त्याने सोनेरी रंग दिलेला दिसतोय. दुसरं म्हणजे त्यांच्या अंगावरही लाखो रुपयांचं सोनं आहे. मात्र कायद्यापुढे सगळे समान आहेत, हे तत्त्व समोर ठेवून सांगवी पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आहे. भर रस्त्यात त्याची कार थांबवून नियम मोडल्याबद्दल पोलिसांनी या गोल्ड मॅनला दंड ठोठवला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
हेही वाचा >>
धक्कादायक! गुप्तांगात मिरची टाकून मजुरास मारहाण, चार दिवस डांबून ठेवलं; लातूर जिल्ह्यातील घटना