एक्स्प्लोर

पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या, तब्बल एक महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस

पुण्यात एका 34 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.  तब्बल एक महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पुणे : पत्नीच्या आणि सासू-सासऱ्यांचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत.  मागील महिनाभरात पुन्हा अशा प्रकारच्या तीन घटना उघडकीस आले आहेत. चतु:शृंगी पोलीस ठाणे आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात नवऱ्याने पत्नी आणि सासू-सासरे यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्या आहेत.असाच आणखी एक प्रकार लोणीकाळभोर परिसरात उघडकीस आलाय. एका 34 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.  तब्बल एक महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

20 नोव्हेंबर 2016 रोजी रोहित पवार आणि रश्मी चव्हाण यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोनच महिन्यात पत्नीने रोहितसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबियांना त्रास नको म्हणून रोहित पत्नीसह स्वतंत्र राहू लागला, तरीही त्याचा त्रास काही कमी होत नव्हता. पत्नी आणि सासू त्याला मिळून त्रास देत होते. या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करू पाहणाऱ्या  तिच्या आईलाही रश्मी आणि तिचे आई-वडील शिवीगाळ करायचे. रोहितने आई-वडिलांशी कुठली संबंध ठेवू नये असे रश्मीचे म्हणणे होते.

खर तर रश्मीला नोकरी करायची होती, पण रोहित तिला म्हणायचा की तू फक्त मुलावर लक्ष दे तुला काय हवं नको ते मी देईन.  परंतु  रश्मी आपल्या नोकरी करण्यावर ठाम होती यावरून देखील दोघात नेहमी वाद होत होते. 7 ऑगस्ट रोजी त्यांच्या याच कारणावरून भांडण झाले आणि रश्मी आई-वडिलांकडे माहेरी निघून गेली. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी रोहितने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली

रोहितने आत्महत्या केल्यानंतर महिनाभरानंतर ढोलकीचे वडील आणि इतर कुटुंबीयांनी त्याचा मोबाईल चेक केला असता धक्कादायक माहिती समोर आली. आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्याने "मी माझ्या जीवाचे बरे वाईट करत असून त्यास माझी पत्नी व सासू जबाबदार आहे" असे असे म्हटले होते.. त्यानंतर कुटुंबियांनी या सर्व प्रकाराबाबत लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी रश्‍मी आणि सासू लता राजेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे..

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget