एक्स्प्लोर

Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?

Pune Nasrapur Case Result: पुण्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज (29 जून) अंतिम फैसला सुनावला.

Pune Nasrapur Case Result: पुणे: पुण्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी (Nasrapur Case Verdict) पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज (29 जून) अंतिम फैसला सुनावला. 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली. न्यायालयाने हा गुन्हा 'अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी' असल्याचे म्हणत भीमराव कांबळेला (Bhimrao Kamble) दोषी ठरवलं आहे. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी नसरापूर प्रकरणाचा निकाल जाहीर केला. (Pune Nasrapur Case Result Marathi News)

नसरापूर प्रकरणातील आरोपीला शिक्षा सुनावताना कोर्टात काय घडलं? (Pune Nasrapur Case Result)

  • विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे न्यायालयात दाखल
  • विशेष सरकारी वकील दाखल...
  • आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयात आणलं
  • न्यायाधीशांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली.

न्यायाधीश निकाल देताना काय म्हणाले? (Pune Nasrapur Case Result)

  • विशेष सरकारी वकिली यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी करताना विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे 12 निकाल सादर/ जोडले आहेत.
  • हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेल आहेत आणि बऱ्याच केसेसमध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे.
  • काही प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे आणि उच्च न्यायालयाचे निकाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेत रुपांतर केले आहे.
  • आधीच्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.  
  • गुन्ह्यातील आरोपीने दाखवलेली क्रूरता आणि त्या घटनेचा समाजावर झालेले परिणाम याची सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवताना दाखल घेण्यात आलेली आहे 
  • पीडिता स्वतःच संरक्षण करू शकण्याच्या स्थितीत होती का नव्हती? तसेच हा रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट प्रमाणात मोडतो का, या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • घटनेच्यावेळी आरोपी पीडितेसोबत होता. तो तिच्यासोबत का होता याची समाधानकारक उत्तर देण्यात आरोपी अपयशी ठरला आहे.
  • याप्रकरणी सगळे बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आलेले आहे.
  • आता हे प्रकरण रिअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात मोडत का? हा प्रश्न आहे.
  • कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याची गंभीरता दर्शवत आणि त्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालांमध्ये याआधीच स्पष्ट केलं आहे.
  • कट रचून हत्या करण्यात आली असेल आणि त्यात क्रूरता असेल तर त्यात फाशीच्या शिक्षेची तरतुद असल्याच न्यायालयाकडून स्पष्ट...
  • शांत डोक्याने केलेली हत्या त्यातील क्रूरता तसेच त्या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिक्षेस पात्र असतात.
  • याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावे आहे. आरोपीचा गंभीर पूर्व इतिहास होता आणि टेस्ट या प्रकरणी सिद्ध होते. 
  • मुलीला टॉर्चर करण्यात आला आहे. 
  • मुलगी helpless होती. स्वतःची हवस पूर्ण करण्यासाठी ही आरोपीने हे कृत्य केलं आहे. याने समाजाला धक्का बसला आहे.
  • आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं. त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता त्याची कल्पना होती की त्याला काही होणार नाही, म्हणून तो ही कृती करायला धजावला.
  • निर्भया प्रकरणानंतर बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा करण्यात आला आहे.
  • आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत केले कृत्य केलेलं कृत्य अतिशय निर्दयी होतं, आणि त्यामुळे समाजमनावर गंभीर दूरगामी परिणाम झाले आहेत. 
  • या घटनेनंतर कुटुंबीयांचा कायद्यावरील विश्ववास उडाल्याची परिस्थिती होती त्यांनी मुंबई बंगळूरु हायवे रोखून धरला होता आणि आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली, एवढी ही गंभीर घटना आहे.
  • समाजामध्ये उमटलेली प्रक्रियेचा आम्ही आदर करतो मात्र आम्हाला कायद्यानुसार चालायला हवं. 
  • अनेक प्रकरणामध्ये चुकीचा तपास होतो कधी न्याय मिळण्यात होणारी दिरंगाई यामुळे समाजाच न्याय प्रक्रियेसंदर्भात चुकीचा समज होतो.
  • याप्रकरणी 16 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होत 
  • उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोर्टाचा पूर्ण वेळ या प्रकरणाला देण्यात आला होता. 
  • 16 दिवसात खटला पूर्ण करण्यात आला. यादरम्यान 55 साक्षीदार तपासण्यात आले. हे सगळ्या प्रकरणामध्ये झालं पाहिजे. मात्र ते एक स्वप्न असेल सगळ्या प्रकरणामध्ये ते शक्य नाही.
  • सादर केलेल पुरावे आरोपी नेच कृत्य केल्याच सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. 
  • पीडित मुलगी अवघ्या तीन वर्षांची होती. 
  • पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाल आहे. 
  • आरोपी फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे.
  • CCTV मध्ये आरोपी चित्रित झाला आहे.
  • त्याच कृत्य अमानुष आहे. 
  • हत्येनंतर देखील त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
  • त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही.
  • आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा अपुरी आहेच, पण फाशीची शिक्षा देखील पुरेशी ठरणार नाही.
  • याआधी 53 वर्षांचा असताना देखील आरोपीने आपल्याच कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ती मुलगी अल्पवयीन होती. 
  • एका म्हातारीवर देखील त्याने हल्ला केला आहे. 
  • तसेच त्याने आणखीनही एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही. त्याने सुधारण्याची पातळी ओलांडली आहे.
  • ही केस एक रिअरेस्ट ऑफ रेअर केस आहे.
  • मुलीला 18 जखमा होता.  
  • मुलीने या दरम्यान सहन केलेल्या वेदना... जे काही 
    मुलीच्या कुटुंबीयांनी सहन केलं असेल याची कोर्टाला जाणीव आहे.
  • याप्रकरणी पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला, त्याबाबत ते अभिमानास पात्र आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे.
  • तपासातील सगळे अभिनंदनासाठी पात्र आहेत. विशेष सरकारी वकील यांनी देखील या प्रकरणाचा सचोटीने पाठपुरावा केला आणि तात्काळ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतली.
  • याप्रकरणी डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट, फॉरेन्सिक तज्ञांनी देखील वाखाण्याजोगी जबाबदारी पार पाडली आणि हे एक टीम वर्कचं काम आहे.
  • आरोपी फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे.
  • बलात्कार आणि हत्येप्रकरणी, पॉक्सो प्रकरणी फाशी
  • निकाल ऐकताच पीडितेच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर
  • आत्ता फासावर चढा न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला ठणकावलं...

आरोपी भीमराव कांबळे काय म्हणाला? (Pune Nasrapur Case Result Bhimrao Kamble)

न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी भीमराव कांबळेची देहबोली बदलून गेली. त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आत्ता फासावर चढा, असं न्यायाधीशांनी भीमराव कांबळेला ठणकावलं.

नेमकं प्रकरण काय? (Pune Nasrapur Case Result)

महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला.  या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात 21 मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम (Pune Nasrapur Case Updates)

  • 1 मे 2026 (संध्याकाळ) - नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.
  • 2 मे 2026- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
  • मे 2026 चा पहिला आठवडा - शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय, तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. याच काळात - नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान - पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, 'डीएनए', साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
  • 16 मे 2026 - अवघ्या सुमारे 15 दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे 1 हजार 200 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
  • 28 मे - न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
  • जून 2026 - सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.
  • 20 जून 2026 च्या सुमारास- दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली.
  • 25 जून 2026 - न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन करण्यात आले.
  • 29 जून 2026- आरोपी भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली.

संबंधित बातमी:

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाच निर्णय

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
Embed widget