एक्स्प्लोर

Pune: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पोलिसांची हफ्तेखोरी? चोपल्यानंतर ट्रॅफिक वॉर्डनची कबुली,व्हिडीओ व्हायरल

वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटलांनी दिली. या घटनेने पोलीस खात्याची प्रतिमा आणखी मलीन झाली.

Pune Crime: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहन चालकांना लुबाडणाऱ्या अर्थात हफ्तेखोरी करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला बेदम चोप देण्यात आलाय. वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे वसूल केल्याचं, ट्रॅफिक वॉर्डनने दिल्याचं व्हायरल व्हिडीओ दिसून येतंय. मारहाणीचा आणि कबुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

संतप्त नागरिकांनी उर्से टोल नाक्यावर रंगेहाथ पकडून त्या वॉर्डनला चांगलाच धडा शिकवला आहे. पाचशे रुपये कोणाच्या आदेशाने वसूल केले? असा प्रश्न संतप्त नागरिकांना विचारला असता, सुरुवातीला केवळ साहेबांच्या आदेशाने म्हणणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनने नागरिकांचं त्रागा पाहून सगळी कबुली दिली. 

नेमकं प्रकरण काय?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर हफ्तेखोरी करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला संतप्त नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप दिला. वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे वसूल करत असल्याचा त्याच्यावर आरोप असून, मारहाणीचा आणि कबुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

केवळ साहेबांच्या आदेशाने म्हणणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनने नागरिकांचं त्रागा पाहून सगळी कबुली दिली. तेंव्हा कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच नाव घेतल्यानं, संतप्त नागरिकांनी त्यांचा मोर्चा त्या वाहतूक पोलिसाकडे वळवला. हा व्हिडीओ पिंपरी चिंचवड पोलिसांकडे ही पोहचला, त्यानंतर याप्रकरणी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. तर संबंधित वॉर्डनला नोकरीवरून काढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पाटलांनी दिली. या घटनेने पोलीस खात्याची प्रतिमा आणखी मलीन झाली.

रंगेहाथ पकडला वॉर्डन

मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनचालकाकडून पाचशे रुपये वसूल करत असताना हा वॉर्डन नागरिकांच्या हाती लागला. नागरिकांनी त्याला थांबवून, “कोणाच्या आदेशाने पैसे घेतोस?” असा प्रश्न विचारला. सुरुवातीला वॉर्डनने फक्त “साहेबांच्या आदेशाने” असे उत्तर दिले, परंतु उपस्थितांचा रोष पाहून त्याने कबुली दिली की, तो एका वाहतूक पोलिसाच्या सांगण्यावरूनच पैसे घेत होता.

वॉर्डनकडून पोलिसाचे नाव ऐकल्यानंतर संतप्त नागरिकांनी थेट त्या संबंधित वाहतूक पोलिसाकडे मोर्चा वळवला. या सर्व घटनेचे व्हिडिओ नागरिकांनी चित्रीत केले असून, सोशल मीडियावर त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. यात वॉर्डन कबुली देतानाचे आणि नागरिकांनी त्याला चोप देतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसते.

पोलिस विभागाची बदनामी

या प्रकरणाने पोलिस विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे. वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली चालकांकडून अवैधरित्या वसुली होत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. अनेक वाहनचालकांनी पूर्वीही अशा तक्रारी केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष रंगेहाथ पकडल्याचा हा प्रकार नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

पोलिस उपायुक्तांचा आदेश

हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे पोहोचताच, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशीत संबंधित वाहतूक पोलिसाचा दोष सिद्ध झाल्यानंतर त्याच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर हफ्तेखोरी करणाऱ्या वॉर्डनला तातडीने नोकरीवरून काढण्याचे आदेशही दिले असल्याची माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: 'दादा, आता राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’; कुणालच्या आत्यांच्या आक्रोशाने सर्वांचेच डोळे पाणावले
'दादा, आता राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’; कुणालच्या आत्यांच्या आक्रोशाने सर्वांचेच डोळे पाणावले
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Embed widget