एक्स्प्लोर

Pune Crime Jalindar Supekar: हगवणेंचा नातेवाईक जालिंदर सुपेकरांवर आणखी एक खळबळजनक आरोप, तुरुंगातील कैद्याकडून 500 कोटी रुपये मागितले

Jalindar Supekar news: जालिंदर सुपेकर यांचे काळे कारनामे आता एक-एक करुन समोर येत आहेत. जालिंदर सुपेकर हे मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक आहेत. गृहखात्याने त्यांचं डिमोशन केलं होतं.

Jalindar Supekar News: वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याबाबत आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) (Special IG Prisons) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती कारागृत बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैद्याकडून 500 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कैद्याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात तशी तक्रार केली आहे. 

पुण्यातील सावकार नानासाहेब आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड हे सूनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन गेली काही वर्षे तुरुंगात आहेत‌ . या बाप-लेकांनी त्यांच्या वकिलांमार्फत जालिदर सुपेकर यांनी त्यांना 550 कोटी रुपये मागितल्याची तक्रार न्यायालयात केली आहे. गणेशचे लग्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दिपक साळुंखे यांच्या मुलीसोबत 2017 मध्ये झाले होते‌. मात्र, हुंड्यासाठी तीचा सतत छळ होत होता. सिगारेटचे चटके देऊन तीला मारहाण होत होती, अशी तक्रार 2021 मधे पोलीसांकडे करण्यात आली. त्यानंतर गायकवाड बाप लेकांना अटक झाली होती. नाना गायकवाडच्या सावकारी विरुध्द अनेक जणांनी तक्रारी केल्याने त्याच्यावर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्याला आणि गणेशला अमरावती कारागृहात हलविण्यात आले‌ . गायकवाडच्या वकीलाने केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरिक्षक असताना 19 ऑगस्ट 2023 ला अमरावती कारागृहात आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला 550 कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत केला आहे. तुम्ही मला पैसे द्या, मी तु्म्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो, असे सुपेकर यांनी सावकार यांनी म्हटल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता गृहखाते जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

जालिंदर सुपेकरांची बदली, डिमोशनही झालं

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले होते. 

आणखी वाचा

जालिंदर सुपेकरांबाबत सुरेश धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, तुरुंगात 300 कोटी मागितले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रारदाराकडे 3 लाखांची मागणी, 1 लाख स्वीकारताना पोलीसच ACB च्या जाळ्यात; त्याच्यात ठाण्यात गुन्हा दाखल
Shubman Gill : शुभमन गिलचं दोन मॅचवरुन परिक्षण करणार असाल तर अवघड होईल, गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराची रोखठोक भूमिका
एक दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी नसल्यास बदलाची मागणी करणार असाल तर अवघड होईल, गिलच्या समर्थनार्थ नेहराची बॅटिंग
Embed widget