पुणे- चित्रपटसृष्टी हा अनेकांचा आकर्षणाचा विषय आहे. या सृष्टीला असणाऱ्या ग्लॅमरमुळे अनेक जण यावर भाळतात. चित्रपट क्षेत्रामध्ये काहीजण यशस्वी होतात. तर अनेक जण अपयशी ठरतात. वरून ग्लॅमरस दिसणाऱ्या या चित्रपटसृष्टीची दुसरी बाजू ही वेगळी आहे. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त झाल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या शॉर्टफिल्ममध्ये काम करण्याची इच्छा अनेकांची असते. पण या इच्छेचा अनेक जण गैरवापर करू शकतात. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.  शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


खुशखबर... दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी; नामांकित बिल्डर्सच्या प्रकल्पातील घरांचाही समावेश


समीर बाळू निकम (वय 31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 21 वर्षाच्या विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत फिर्यादीच्या घरी आणि परिसरात हा प्रकार सुरू होता.  पुण्यामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना समोर येताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर गुन्हेगारी देखील वाढताना दिसत आहे.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात, सहा वाहनं एकमेकांना धडकली, तिघांचा मृत्यू


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी समीर हा शॉर्टफिल्म बनवतो. त्याने काही गाणी देखील तयार केली आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने विवाहित महिलेशी ओळख वाढवली. त्यांना फिल्म इंडस्ट्रीत स्थायिक करण्याचे आमिष दाखवले. हे सर्व आमिष दाखवून  त्याने पीडित विवाहितेसोबत वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यानंतर फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.


Pune : महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल