Kartik Aaryan film Dhamaka Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी 'धमाका' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. कार्तिक या चित्रपटामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवनी यांनी केले असून निर्मीती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
कार्तिकने शेअर केला ट्रेलर
धमाका चित्रपटाचा ट्रेलर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर शेअर केली. हा ट्रेलर शेअर करून कार्तिकने त्याला कॅप्शन दिले, 'मी अर्जुन पाठक आहे. जे काही बोलेन ते खरं बोलन'. कार्तिकच्या चाहत्यांनी त्याच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती दिली आहे. कार्तिक या चित्रपटामध्ये अर्जुन पाठक या न्यूज अॅंकरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की , अर्जुन पाठकला रेडियो शोमध्ये एक अलार्मिंग कॉल येतो आणि त्या कॉलमुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाते.
कार्तिकने शूटिंगबद्दल दिली माहिती
एका मुलाखतीमध्ये कार्तिकने त्याच्या या चित्रपटाबद्दल सांगितले, 'या चित्रपटाचे चित्रीकरण यूनिक पद्धतीने पूर्ण कऱण्यात आले. चित्रपटाचे शूटिंग हे 11 दिवसांमध्येच पूर्ण करण्यात आले. त्यामधील मी असलेल्या भागाचे शूटिंग 9 दिवसांमध्ये पूर्ण झाले आहे. ' या चित्रपटामध्ये कार्तिकसोबत मृणाल ठाकुर आणि अमृता सुभाष या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसतील. धमाका हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून हा कार्तिकचा ओटीटीवर रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे. लवकरच आर्जुनचे 'भूल भुलैया 2', 'शहजादा', 'कॅप्टन इंडिया' आणि 'फ्रेडी' हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.