Pune Mhada Lottery : पुणे आणि परिसरात घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. मुंबई आणि परिसरानंतर बहुतांश लोकांचा कल हा पुण्यात घर घेण्याचा असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाच्या (Mhada) वतीनं तब्बल 3 हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांमध्ये जवळपास दीड हजार घरं 20 टक्क्यातील आणि नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या एक - दीड वर्षांत आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली होती. अशातच एका वर्षांत घरांच्या लॉटरीची 'हॅटट्रिक' करत पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी आणखी एक विक्रम केला आहे. कोरोनाता प्रादुर्भाव आणि त्यामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन यांमुळे अनेकांची आर्थिक बाजू कोलमडली आहे. अशातच गरिब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला आहे. याआधी कोरोनापूर्वी जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीनं आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी म्हणजेच, 5 हजार 657 घरांची सोडत काढण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही घरांची लॉटरी काढण्यात आली होती.
म्हाडाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही सर्वसामान्यांसाठी घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. अशातच आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी तीन हजार पेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढत आहे. यामध्ये दीड हजार घरं वीस टक्क्यातील आणि सर्व नामांकित, मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती नितीन माने पाटील यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
MHADA Lottery 2021 : म्हाडा कोकणाच्या 8948 घरांसाठी सोडत जाहीर; कशी पाहाल लाभार्थ्यांची यादी?