Hardik Pandya on MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) भरभरुन कौतुक केलं आहे. पांड्यानं म्हटलं आहे की, हा विश्वचषक माझ्या करियरचं सर्वात मोठं आव्हान आहे. कारण यावेळी महेंद्रसिंह धोनी संघात नाही. माझ्या खांद्यावर मोठा भार असल्याचं मी मानतो. हा वर्ल्डकप रोमांचक होणार आहे. तो म्हणाला की, धोनी मला खूप समजून घेतो. मी त्याच्या खूप जवळ आहे. तो एकमेव व्यक्ती आहे जो मला शांत करू शकतो. धोनी माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावासारखा आहे. मी त्याचा आदर करतो कारण जेव्हा मला गरज होती तेव्हा त्याने मला मदत केली, असं त्यानं म्हटलं.
पांड्यानं सांगितलं की, एका टीव्ही शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याला निलंबित केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये न्यूझीलॅंड दौऱ्यावर पाठवण्यात आले. तेव्हा सुरुवातीला माझ्यासाठी हॉटेलमध्ये जागा नव्हती. नंतर मला फोन आला की धोनीने माझ्यासाठी खोलीची व्यवस्था केली आहे. धोनी म्हणाला होता की तो बेडवर झोपत नाही. तो खाली झोपेल आणि मी त्याच्या बेडवर असेल. तो अशी व्यक्ती आहे जो नेहमी मला मदत करण्यास तयार असतो, असं तो म्हणाला.
पांड्यानं म्हटलं आहे की, धोनी माझा लाईफ कोच आहे. माही आणि माझं नातं एकदम घट्ट आहे. माही भाई डार्लिंग सारखा आहे. मी त्याच्याबरोबर अनेक गोष्टी करू शकतो जे इतर कोणी करू शकत नाही. मी त्याच्यासोबत एमएस धोनी सारखा वागत नाही. मी काही करत असेल तर ते विचारपूर्वक करतो, हे धोनीला माहित आहे, असं तो म्हणाला.
त्यानं म्हटलं आहे की, धोनीनं मला माझ्या कारकीर्दीत अनेक वेळा मदत केली. माही माझ्यासाठी माझ्या भावासारखा आहे. मी त्याचा आदर करतो कारण जेव्हा मला गरज होती तेव्हा त्याने मला मदत केली.