एक्स्प्लोर

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं, धोतरावर रक्तांचे डाग; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारी शरण यांनी 25 सप्टेंबर रोजी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांचे शिष्य दीपक कुमार (रसिक दुलारी शरण) यांनी 25 सप्टेंबर रोजी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Rasik Dulari Sharan Death Case) केली. आता सदर प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रसिक दुलारी शरण यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. रसिक दुलारी यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरुन विविध प्रश्न उपस्थित होत आहे. रसिक दुलारी यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या आणि त्यांच्या धोतरावर रक्ताचे डाग असल्याचेही समोर आले आहे. (Premanand Maharaj Ashram Marathi News)

रसिक दुलारी यांच्या कुटुंबीयांचा हादरवणारी माहिती- (Rasik Dulari Sharan Death Case)

रसिक यांच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, आश्रमाकडून त्यांना रसिक यांना भेटण्यापासून रोखले जात होते. ही आत्महत्या असल्याचे आश्रमाचे म्हणणे असले तरी, इतरांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एखादी व्यक्ती स्वतःच्या गुप्तांगाला इजा कशी पोहोचवू शकते, कापलेला भागाचा चुरा कसा करू शकते आणि त्यानंतर चार मजली इमारतीवरून उडी कशी मारू शकते?, असा आरोप रसिक दुलारी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

आश्रमात खळबळ, सर्वांनाच धक्का- (Rasik Dulari Sharan Death Case)

दीपक कुमार यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण आश्रमात खळबळ उडाली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येमागचे नेमके कारण कोणालाच समजू शकलेले नाही. दरम्यान, पोलीस आश्रमातील लोकांची चौकशी करत आहेत, जेणेकरून याचे खरे कारण समोर येऊ शकेल. मृताच्या कुटुंबीयांना याबद्दल कळवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूंनी करत आहेत. रसिक दुलारी शरण यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

नेमके प्रकरण काय? (Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case)

एसपी राजीव कुमार यांच्या माहितीनुसार, प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाच्या मागे एक निवासी वसाहत (सोसायटी) आहे. दीपक कुमार गेल्या दीड वर्षांपासून या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये राहत होते. 'रसिक दुलारी शरण' म्हणूनही ओळखले जाणारे दीपक मूळचे जबलपूरचे रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली; या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. दीपक यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये प्रेमानंद महाराज यांच्याकडून 'दीक्षा' घेतली होती.

कोण होते रसिक दुलारी? (Who Is Rasik Dulari?)

रसिक दुलारी हे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी होते आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी वृंदावनला आले होते. वृंदावनमध्ये त्यांनी प्रेमानंद महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली आणि 'दीपक लोधी' हे नाव बदलून 'रसिक दुलारी शरण' असे नाव धारण केले. त्यांच्या पश्चात त्यांचा धाकटा भाऊ आणि मोठी बहीण असा परिवार आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दीक्षा घेतल्यानंतर त्यांचा रसिक दुलारीसोबत कोणताही संपर्क राहिला नाही. रसिक यांच्या आईने वर्षभरापूर्वी वृंदावनला भेट दिली होती, परंतु आश्रमाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रसिक यांना भेटू दिले नाही, असा दावा त्यांनी केला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, 'गुरुदक्षिणा' स्वीकारल्यानंतर आश्रमाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यापासून रोखले आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे पुढे केली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Embed widget