Premanand Maharaj Disciple: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याचं टोकाचं पाऊल; चौथ्या मजल्यावरून मारली उडी, आश्रम परिसरात खळबळ, कारण अस्पष्ट
Premanand Maharaj Disciple: दीपक यांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमामागील सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

वृंदावन (उत्तर प्रदेश): मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांचे शिष्य दीपक कुमार उर्फ 'रसिक दुलारी सरन' यांची संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक यांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमामागील सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण आश्रम परिसर आणि भक्तांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.(Premanand Maharaj)
घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत सर्वोदय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वृंदावन कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टमासाठी) पाठवला आहे.
Premanand Maharaj : नेमके प्रकरण काय?
एसपी सिटी (SP City) राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या मागे असलेल्या एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये दीपक कुमार हे गेल्या दीड वर्षापासून राहत होते. दीपक उर्फ रसिक दुलारी सरन हे मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी होते. त्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये संत प्रेमानंद महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली होती. शुक्रवारी त्यांनी अचानक चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या टोकाच्या पावलामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Premanand Maharaj : पोलीस तपास सुरू; हत्येचा आणि आत्महत्येचा संशय
दीपक कुमार यांनी अचानक एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल सर्वत्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. सध्या पोलीस आश्रमातील इतर लोक आणि परिसरातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत. हा प्रकार आत्महत्या आहे की यामागे काही वेगळा कट (हत्या) आहे, या दोन्ही शक्यता विचारात घेऊन पोलीस तपास पुढे नेला जात आहे.
Premanand Maharaj : आश्रम आणि सोसायटीत शांतता
दीपक कुमार यांच्या या मृत्यूनंतर आश्रमात भीतीचं वातावरण पसरले आहे. या घटनेसंदर्भात अद्याप आश्रमाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य किंवा प्रतिक्रिया समोर आलेली नाही, तसेच सोसायटीतील रहिवासीही काहीही बोलण्यास तयार नाहीत. एका निष्ठावंत शिष्याने अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
तर एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना प्राथमिक तपासात 26 वर्षांच्या रसिक दुलारी यांच्या प्रायव्हेट पार्टवर दुखापत आणि जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यांच्या रूममधून एक ग्राइंडर सापडला आहे. रसिक दुलारी यांनी स्वत:ला दुखापत करण्यासाठी याचा वापर केला का? याचा तपास पोलीस करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रसिक दुलारी यांचं लिंगही कापलेलं होतं, तसंच बरंच रक्तही वाहत होतं.





















