एक्स्प्लोर

Crime News : कल्याण शहरात खळबळ, लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

Crime News : स्टेशन परिसरातील लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. महिलेची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 

कल्याण : दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटत नाही तोच स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमधील एका रूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असे या मयत महिलेचे नाव असून ती एका इसमासोबत काल दुपारच्या सुमारास लॉजमध्ये आली होती, आज सकाळी तिचा मृतदेह आढळून आलाय. तिच्यासोबत असलेला इसम भूपेंद्र गिरी हा फरार झालाय. या महिलेची हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय .

कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉज मधील एका रूम मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असा या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती. ज्योती तोरडमल ही भूपेंद्र गिरी नावाच्या एका इसमासोबत काल दुपारच्या सुमारास स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजवर आली होती . आज सकाळी बराच वेळ झाला मात्र दरवाजा उघडत नसल्याने लॉज मधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ज्योतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ महात्मा फुले पोलिसांना याबाबत माहिती दिली. महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलाय. ज्योतीसोबत आलेला भूपेंद्र गिरी हा पसार झालाय. ज्योतीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फरार झालेल्या भूपेंद्र गिरी याच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना झालेत. भूपेंद्र ताब्यात आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

काल शनिवारी साडेतीनच्या सुमारास मयत ज्योती तोरडमल आणि भुपेंद्र गिरी यांनी तृप्ती लॉजचा रूम भाड्याने  घेतली.  काहितासात भुपेंद्र जेवण पार्सल आणण्यासाठी खाली जात असल्याचे लॉज मॅनेजरला सांगून गेला. सकाळी नेहमीप्रमाणे लॉजचा  वेटर रुम सर्व्हिससाठी त्याने दरवाजा वाजवला बराचवेळ दरवाजा वाजवला, पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे वेटरने दरवाजाच्या लॅचला हात लावताच दरवाजा उघडा आसल्याने वेटर रूम मध्ये शिरला मॅडम "आपका टाइम खतम हुआ है, उठीये " महिलेचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या वेटरने घडलेला प्रकार मॅनेजरला सांगितला. मॅनेजरने खात्री केली आणि कल्याण महात्मा फुले चौक पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील,पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी आपल्या टीमसह घटनेची पाहणी केली.  पोलिसांच्या माहितीनुसार मृत महिलेच्या नाकातून रक्त श्राव होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी महिलेच्या तोंडावर उशी ठेऊन तिचा खून केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे फॉरेन्सिक टीमला प्रचारण करून तपास सुरू केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget