एक्स्प्लोर

Phaltan Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

Phaltan Doctor Case: फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात गोपाळ बदने याला जामीन मंजूर झाला आहे.

Phaltan Doctor Case: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या खळबळजनक आत्महत्या प्रकरणात गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बडतर्फ पीएसआय (PSI) गोपाळ बदने याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि काही अटींवर हा जामीन दिला आहे.

Phaltan Doctor Case: पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर

23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली होती. बदने गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.

Phaltan Doctor Case: नेमकं प्रकरण काय होतं?

मूळची बीड येथील असलेली ही महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होती. ती प्रशांत बनकर याच्या घरी भाड्याने राहत होती. काही कारणास्तव घरमालक बनकर आणि डॉक्टर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर तिच्या घराला कुलूप लावण्यात आले होते. यानंतर तिने 'मधूदीप' हॉटेलमध्ये दोन दिवसांसाठी खोली आरक्षित केली. तिने मदतीसाठी प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने याच्याशी संपर्क साधला होता, मात्र तिला अपेक्षित मदत मिळाली नाही.  दोन दिवस खोलीचा दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी तो तोडला असता, डॉक्टरने आत्महत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, तिने मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर एक चिठ्ठी (नोटीस) लिहिली होती. त्यात गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्या शारीरिक व मानसिक छळामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते.

Phaltan Doctor Case: न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणात फलटण पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने काही अटी घालत बदनेचा जामीन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे तपास यंत्रणांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको 'ते' व्हिडीओ, अन् पुढे...; खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक मोठं कांड, नेमकं प्रकरण काय?

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मुलावर SIT कडून प्रश्नांची सरबत्ती, पण मुलाचं सर्व प्रश्नांना आढेवेढे घेत एकच उत्तर; म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget