एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या मुलावर SIT कडून प्रश्नांची सरबत्ती, पण मुलाचं सर्व प्रश्नांना आढेवेढे घेत एकच उत्तर; म्हणाला...

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली.

Ashok Kharat Case Nashik Crime News: भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) अहोरात्र प्रयत्न करत आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक गेले असता ती पथकाला सापडली नाही. यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. SIT ने त्याची कसून चौकशी केली. मात्र, या चौकशी दरम्यान हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांना "सर्व काही डॅडलाच माहिती आहे" असे उत्तर देत माहिती देण्याचे टाळले. असे असले तरी, घरामध्ये मोठ्या प्रमाणात 'कॅश' येत असल्याची महत्त्वपूर्ण कबुली त्याने दिल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

SIT ने हर्षवर्धनवर प्रश्नांची सरबत्ती केली असता, त्याने एक धक्कादायक माहिती दिली. "घरामध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणात येत होती," असे त्याने पोलिसांना सांगितले. हर्षवर्धनच्या या कबुलीमुळे अशोक खरात केवळ जमीन फसवणूक आणि सावकारीच नाही, तर 'हवाला रॅकेट' देखील चालवत असावा, असा संशय आता पोलिसांना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरात कोठून येत होती? आणि ती कोणाला दिली जात होती? याचा तपास सुरु आहे. तर इतर गोष्टीत खरातच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली नाही. 'सर्व डॅडला माहिती', असे सांगत त्याने माहिती देण्यास नकार देत आढेवेढे घेतल्याची माहिती मिळत आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची पत्नी अजूनही फरार

दरम्यान, शिर्डीतील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देऊन, सावकारी पाशात ओढून जमीन बळकावल्याचा आरोप खरात कुटुंबावर आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल होताच ती फरार झाली आहे. SIT चे पथक अशोक खरातच्या घरी गेले असता त्याची पत्नी कल्पना खरात तिथे सापडली नाही. यानंतर पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case Nashik Crime News: कल्पना खरात फरार, लूकआऊट नोटीस जारी; आता SIT चं पथक खरातच्या पत्नीच्या माहेरी पोहोचताच हादरवणारी माहिती

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget