Parbhani Crime : परभणीच्या गंगाखेडमध्ये चहा सिगारेट उधारीवर न दिल्यानं बेदम मारहाण, हॉटेल चालकाचा मृत्यू,शहरात खळबळ
Parbhani News : परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये एका हॉटेल चालकाचा खून करण्यात आला. चहा आणि सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून ही घटना घडली आहे.

परभणी : चहा,सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून बेदम मारहाण करत हॉटेलचालकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.परभणीच्या गंगाखेड शहरातील गोदाकाठावर ही घटना घडली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उधारीवर चहा व सिगरेट न दिल्याच्या रागातून दोन जणांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणी मध्ये हॉटेल चालकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीच्या गंगाखेड शहरातील गोदाकाठावरील घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
गंगाखेड मधील गोदाघाटावर मारोती साळवे यांचे बाबा सैलानी नावाचे चहाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर आज आवेज खान गफ्फार खान,जुनेद खान जरावर खान हे दोघे जण आले त्यांनी किशोर भालेराव यांच्या सांगण्यावरून चहा सिगरेट मागितली मात्र हे दोघे नेहमी वस्तू घेवून पैसे देत नसल्याने साळवे यांनी त्यांना चहा सिगरेट दिली नाही. मग रागात येवून या दोघांनी थांब तुला दाखवतो तुला खूप माज आलाय असे म्हणत तिथून निघाले. यावेळी मारोती साळवे व अरविंद साळवे यांनी या दोघांचा पाठलाग केला व त्यांना तुम्ही आम्हाला वारंवार का त्रास देत आहात अशी विचारणा केली. यानंतर दोघांकडन ही मारोती साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणात अरविंद साळवे यांच्या फिर्यादीवरून अवेज खान गफार खान पठाण. रा. नेहरू चौक गंगाखेड.जुनेद जरवार खान रा. वजीर कॉलनी गंगाखेड.किशोर मंचक भालेराव रा. नवा मोंढा गंगाखेड.यांच्या विरोधात भारतीय न्याय सहिंता 2023 नुसार 103(1),115(2),352, 351(1), 3(5), अनुसचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंद )1989नुसार. 3(2)(VA), 3(1)(r),3(1)(s) नुसार पोलीस ठाणे गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून,गुन्हा होण्या आधीच गंगाखेड पोलीस आणि स्थानिक गुन्हे सायबरच्या पाथकाने गुन्हातील तिन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात आली आहे.
इतर बातम्या :























