(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : मामी आणि भाच्याचं जुळलं प्रेमाचं सूत... पत्नीनं विरोध केला, तर विष देऊन संपवलं आणि नदीत फेकलं
Crime News : पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. बिहारमधील भागलपूरच्या नवगचियामध्ये मामीवरच्या प्रेमापोटी भाच्यानं क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. मामीवर जीवापाड करणाऱ्या भाच्यानं आपल्या पत्नीची विष पाजून हत्या केली आहे. यानंतर पत्नीनं मृतदेह कोसी नदीत फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमधील नवगचिया पोलिसांना 5 जुलै रोजी जहांगीरपूर बैसी गावातून माहिती मिळाली होती की, गावातील रहिवासी मोहम्मद फयाज यानं पत्नी शबनम खातूनची हत्या करून तिचा मृतदेह कोसी नदीत फेकून दिला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून यासंदर्भात माहिती घेतली. मोहम्मद फयाज यानं त्याच्या मामीसह पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर त्यानं पत्नीला ॲसिड पाजल्याचं तपासात उघड झालं. पत्नीचा विष पिऊन मृत्यू झाल्यानंतर तिनं मृतदेह नदीत फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
चौकशीदरम्यान आरोपी मोहम्मद फैयाजनं पोलिसांना सांगितलं की, त्याचे आणि त्याच्या मामीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. पत्नी शबनमनं दोघांच्या प्रेमाला विरोध केला. याच कारणावरुन आरोपी मोहम्मदला राग अनावर झाला. त्यानं मामीसोबत मिळून पत्नीला आपल्या प्रेमाच्या वाटेतून हटवण्यासाठी कट रचला. ठरल्याप्रमाणे दोघांनी शबनमला आधी शबनमला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला जबरदस्तीनं विष पाजलं. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला.
हत्येनंतर आरोपीनं पत्नीचा मृतदेह नदीच्या जोरदार प्रवाहात फेकून दिला होता. अद्याप शबनम खातूनचा मृतदेह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीनं मृतदेहाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी मृत शबनमचा पती आणि त्याच्या मामीला अटक केली आहे.
या घटनेबाबत एसडीपीओ काय म्हणाले?
एसडीपीओ ओम प्रकाश यांनी सांगितलं की, समीमा खातून नावाच्या महिलेनं 5 जुलै रोजी रंगरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यामध्ये महिलेनं सांगितलं होतं की, तिच्या मुलीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, मात्र तिच्या सुनेचं तिच्या जावयासोबत अनैतिक संबंध होते. मुलीचा याला विरोध असायचा. विरोधामुळे मामी आणि मुलगा दोघेही मुलीला मारहाण करायचे आणि पैशाची मागणीही करायचे. दरम्यान, मुलीची हत्या झाली. पोलिसांनी मृताचा पती मोहम्मद फयाज आणि मामी रीना खातून यांना अटक केली आहे. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.