एक्स्प्लोर

NEET Fee Refund : नीट परीक्षा फी परताव्यावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; RE-NEET सोबत CBI तपासात नवे धागेदोरे

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीनंतर NTA ने आधीचे परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र फी विद्यार्थ्यांच्या खात्यात की नेट कॅफे चालकांच्या खात्यात जमा होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

NEET Fee Refund : NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर एनटीएने (National Testing Agency) RE-NEET घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र हा परतावा नेमका विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार की नेट कॅफे किंवा सेतू केंद्र चालकांच्या खात्यात, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

NEET साठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून 1700 रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये शुल्क आकारण्यात आले होते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज नेट कॅफे आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून भरल्याने ऑनलाइन व्यवहार संबंधित चालकांच्या खात्यांतून झाले होते, तर विद्यार्थ्यांनी त्यांना रोख रक्कम दिली होती.

RE NEET 2026 : फी नेमकी कोणाच्या खात्यात जमा होणार?

NTA कडून फी परताव्याची घोषणा झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की, रिफंड मूळ व्यवहार ज्या खात्यातून झाला त्याच खात्यात जमा होणार का? तसे झाल्यास अनेक विद्यार्थ्यांचे पैसे थेट नेट कॅफे चालकांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःचे किंवा पालकांचे बँक तपशील अद्ययावत ठेवावेत, तसेच फी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक यंत्रणा तयार करण्याची मागणी तज्ज्ञांनी केली आहे.

NEET Paper Leak : NTA कार्यालयातूनच पेपर फुटल्याचा संशय

दरम्यान, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर नाशिक किंवा इतर केंद्रांमधून फुटला नसून तो थेट NTA च्या कार्यालयातूनच लीक झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांनी या दिशेने चौकशी सुरू केली आहे.

CBI Investigation NEET : सोशल मीडियावरून तयार केले विद्यार्थ्यांचे नेटवर्क

या प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने करिअर काऊन्सिलिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मोठे नेटवर्क तयार केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया, फोन आणि ऑनलाइन माध्यमांतून मार्गदर्शन देत तो विद्यार्थ्यांचे अर्ज, प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षांशी संबंधित सेवा पुरवत होता. याच नेटवर्कच्या माध्यमातून विविध राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून पेपर विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

NEET Maharashtra Connection : नगर, पुणे आणि नाशिक कनेक्शन

Central Bureau of Investigation ने तपासाचा विस्तार महाराष्ट्रात केला असून अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक येथून अटकसत्र सुरू आहे. अहिल्यानगरमधील ओंकार शिंगोटे या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तसेच धनंजय लोखंडे हा या घोटाळ्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Pune Agents NEET : विद्यार्थ्यांचा एजंट म्हणून वापर

धनंजय लोखंडेने विविध शहरांतील एजंटमार्फत NEET प्रश्नपत्रिका विक्रीचे जाळे उभे केले होते. मनिषा वाघमारे (Manisha Waghmare) आणि शेषराव सोळंकी यांच्यासारख्या व्यक्तींमार्फत पैसे गोळा करणे आणि इच्छुक विद्यार्थ्यांचा शोध घेणे अशी कामे केली जात होती. शेषराव सोळंकीच्या मोबाईलमधील संभाषण तपासल्यानंतर या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर आले आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Embed widget