मेट्रो स्टेशनकडे जाताना कारमध्ये बसवलं, बंदुकीच्या धाकावर लैंगिक संबंधाची मागणी, नवी मुंबईत धक्कादायक प्रकार, आरोपीवर गुन्हा
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीचा विषय बनली आहे .यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे .

Navi Mumbai Crime: मेट्रोस्टेशनकडे रस्त्यावरून चाललेल्या महिलेचा पाठलाग करत महिलेला गाडीत बसवले, नंतर बंदुकीचा धाक दाखवत लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील तळोजा परिसरात घडला होता . 7 जून रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणात गुन्हाच दाखल झाला असून या प्रकरणातील आरोपी कुंदन नेटके याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही .
नेमके घडले काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सात जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली .पीडित महिला मेट्रो स्टेशन कडे चालत असताना आरोपी कुंदन नेटके यांनी तिचा पाठलाग करत गाडी थांबवली .मला एक बोलायचं असं म्हणत त्याने पिढी त्याला गाडीत बसण्यास भाग पाडलं . त्यानंतर गाडीमध्येच त्याने पिडीतेने लैंगिक संबंधांची मागणी केली .विरोधकथाच बंदूक दाखवत राहिलेस धमकावलं .या घटनेनंतर पीडित महिलेने कशीबशी आपली सुटका करत थेट तळोजा पोलीस ठाणे गाठले .आणि तक्रार दाखल केली .पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत कलम 4 (लैंगिक छळ ) आणि कलम 3(2) अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे .
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, पीडितेचे जबाब आणि इतर पुरावे गुळात केले जात आहेत .आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले .या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीचा विषय बनली आहे .यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे .
महाराष्ट्रातील आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील (Pahalgam) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये महाराष्ट्रातील 70 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित वृद्ध महिला फिरण्यासाठी पहलगाममध्ये गेली होती. यादरम्यान 11 एप्रिल रोजी पीडित वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचं सांगण्यात येक आहे.
सदर प्रकरणातील आरोपी झुबैर अहमद ताब्यात घेतले असून 30 जून 2025 रोजी अनंतनाग जिल्हा कोर्टात याबाबत सुनावणी झाली. जेव्हा न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली तेव्हा त्याने आरोप नाकारले, परंतु न्यायालयाने त्याला जामीन नाकारत या घटनेतील मानसिकता अत्यंत विकृत असल्याचे ठामपणे निदर्शनास आणून दिले. आरोपी झुबैर अहमद हा पहलगाममधील स्थानिक रहिवाशी आहे.
हेही पहा:























