मुंबई आयआयटीतील मुलीचा पोलिसाकडून विनयभंग, नवी मुंबईतील पाम बीचवरील धक्कादायक घटना
Navi Mumbai Crime News : पोलिसानेच मुंबई आयआयटीतील मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) पाम बीचवर ही धक्कादायक घटना घडली आहे.
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील (Navi Mumbai) पाम बीचवर एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसानेच मुंबई आयआयटीतील मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीने तक्रादर देऊन सुद्धा याबाबत कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. काल पहाटे तीन वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काल पहाटे आपल्या वर्गमित्रासोबत नवी मुंबईतील पाम बिचवर गेली होती. यावेळी एक पोलिस कॉन्स्टेबल गणवेशात त्यांच्याजवळ आला. त्याने दोघांकडे यावेळी येथे काय करत आहात अशी विचारपूस केली. त्या दोघांना पोलिसाने काही चुकीचे प्रश्न देखील विचारले. यावेळी त्यांनी उत्तर देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित पोलिसाने मुलीचा विनभंग केला असा आरोप, पीडित मुलीने आणि तिच्या मित्राने केला आहे.
Navi Mumbai Crime News : तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पीडितेला धमकावलं
हा संपूर्ण प्रकार सुरू असतानाच तेथून एक गाडी चालली होती. गाडीतील लोकांनी दोघांची मदत केली आणि त्यांना नवी मुंबईतील सांगपाडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे संबंधित कॉन्स्टेबलविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने त्या दोघांना भीती दाखवली, धमकावण्यात आलं. तुम्ही तक्रार दाखल केली तर तुम्हाला कोर्टाच्या चकरा माराव्या लागतील, तुमची बदनामी होईल, अशी भीती संबंधित अधिकाऱ्याने दाखवली. त्यानंतर हे दोघे पुन्हा आयआयटी कॅम्पसमध्ये आले. तेथे आयआयटीच्या डीनला त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यामुळे डीन यांनी झोन दहाच्या डीसीपीसोबत संपर्क साधून याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या पवई पोलिस ठाण्यात पीडित मुलीचा झीरो एफआयआर दाखल करून घेण्यात आाल. परंतु, हा प्रकार नवी मुंबईच्या हद्दीत घडला असल्याने ती तक्रार पुन्हा सांगपाडा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. सांगपाडा पोलिस आता याबाबतचा पुढील तपास करत आहेत.
मुंबई आणि नवी मुंबईसारखी शहरे महिलांसाठी सुरक्षित असताना एका पोलिसाकडूनच असे कृत्य होत आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे ज्या कॉन्स्टेबलने विनयभंग केला त्याच्याविरोधात तक्रार करून देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या घटनेमुळे आता पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित कॉन्स्टेबलवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
खळबळजनक! भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्याबाहेर आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह