एक्स्प्लोर

Nashik TCS Case: निदा खानला कुणाच्या सांगण्यावरून घर दिलं? एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवर प्रश्नांची सरबत्ती; एसआयटीच्या चौकशीत काय माहिती समोर येणार?

Nashik TCS Case: निदा खानला बेकायदेशीरपणे आश्रय देणारे छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल अखेर आज नाशिक पोलिसांसमोर हजर झाले आहे.

Nashik TCS Case: राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद' (Corporate Jihad), धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी महिला निदा खान (Nida) हिला बेकायदेशीरपणे आश्रय देणारे छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) अखेर आज नाशिक पोलिसांसमोर (Nashik Police) हजर झाले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात (Nashik Police Commissionerate) विशेष तपास पथकाकडून (SIT) गेल्या दोन तासांपासून मतीन पटेल यांची कसून चौकशी सुरू आहे.

Nashik TCS Case: नोटीस मिळताच नरमाईची भूमिका; वकिलांसह हजर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान नाशिकमधून फरार (Absconding) झाली होती. या काळात मतीन पटेल यांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःच्या घरात लपवून ठेवत आश्रय (Sheltered the Accused) दिला होता. याप्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मतीन पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक पोलिसांचे पथक त्याच्या शोधार्थ संभाजीनगरमध्ये गेले होते, मात्र ते मिळून आले नव्हते.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात नाशिक रोड न्यायालयात (Court) रीतसर दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले. दोषारोपपत्र दाखल होताच गुन्हे शाखेने (Nashik Crime Branch) मतीन पटेल यांना थेट कायदेशीर नोटीस (Legal Notice) बजावली. कोणतीही पळवाट न उरल्याने अखेर मतीन पटेलने नरमाईची भूमिका घेत आज, 25 मे रोजी आपल्या वकिलांसह (Lawyers) नाशिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

Nashik TCS Case: एसआयटीकडून प्रश्नांची सरबत्ती; घरमालकाचीही होणार चौकशी

सध्या एसआयटी (SIT) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मतीन पटेल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या घरात राहत होती, ते घर नेमके कोणाच्या सांगण्यावरून मतीनने उपलब्ध करून दिले? याचा शोध पोलीस घेत आहेत. यासोबतच, ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते, त्या मूळ घरमालकाचा (House Owner) देखील एसआयटी जबाब (Statement) नोंदवून घेणार आहे. या चौकशीनंतर मतीन पटेल यांना अटक होणार की त्यांना सोडले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी संभाजीनगर महानगरपालिकेने मतीन यांच्या घर आणि कार्यालयावरही कारवाई केली होती.

Nashik TCS Case: बँक खाती सील; आज जामीन अर्जावर सुनावणी

दुसरीकडे, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे (Financial Transactions) धक्कादायक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याने पीडितेकडून 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा (Extortion) खुलासा झाला असून, एसआयटीने त्याचे बँक खाते सील (Bank Account Sealed) केले आहे. या गुन्ह्यात फसवणुकीचे सबळ पुरावे जोडण्यात आले असून, लवकरच पुरवणी दोषारोपपत्र (Supplementary Charge Sheet) दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज दुपारच्या सत्रात नाशिक रोड न्यायालयात मुख्य आरोपी निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या तिघांच्याही जामीन अर्जावर (Bail Application) महत्त्वाची सुनावणी (Hearing) होणार असून, न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Chhatrapati Sambhajinagar : सत्ताधारी नगसेवकांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी? इम्तियाज जलील यांच्या प्रश्नावर मनपा आयुक्तांची सारवासारव

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Crime News : आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget