एक्स्प्लोर

Nashik Crime : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदारावर आयुक्तांची मोठी कारवाई

Nashik Crime : नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) अंमलदाराने प्रेमसंबंध ठेवून विवाहाचे आमिष दाखवत विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Nashik Crime : नाशिक शहर पोलीस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) अंमलदारावर प्रेमसंबंध ठेवून विवाहाचे आमिष दाखवत विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि नंतर तिच्या पतीसह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी अंमलदाराला अटक केली आहे. (Nashik Crime News)

अभी उर्फ चंद्रकांत शंकर दळवी (35, रा. कितकीनगर, म्हसरूळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो सध्या शहर पोलीस आयुक्तालयाच्या आरसीपी पथकात कार्यरत होता. या प्रकरणी पाथर्डी फाटा परिसरातील 25 वर्षीय विवाहित तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

विवाहित तरुणीवर वारंवार बलात्कार 

याबाबत अधिक माहिती अशी की, पेशाने पोलीस अंमलदार असलेल्या चंद्रकांत दळवी याने 2020 ते 23 मे 2025 या कालावधीत तिच्याशी जवळीक साधून वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला. राणेनगर येथील 'कशिश लॉज', सातपूर येथील 'सिटाडेल' आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमधील प्रकारांचा तक्रारीत उल्लेख आहे. 
प्रेमाच्या नावाखाली जवळीक साधून, 'लग्न करतो' असे म्हणत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. त्याचे लग्न झालेले असताना वैदीक पद्धतीने लग्न करत तरुणीला घरी घेऊन न जाता तिची फसवणूक केली. तसेच तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीचे अश्लील फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले. या प्रकरणी दळवी विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस अंमलदारावर मोठी कारवाई 

विशेष म्हणजे, आरोपीने याआधी पोलिसाच्या वर्दीत अनेक रील्सदेखील तयार करून इंस्टाग्राम व फेसबुकवर पोस्ट केल्या असून, सोशल मीडियावर त्याचे मोठे फॉलोइंग आहे. त्यामुळे तो कायम चर्चेत असायचा. आता त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे संशयित आरोपी पोलिस अंमलदार अभी दळवीच्या विरोधात कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.  या गुन्ह्याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दळवीला शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

आणखी वाचा 

Beed Crime: नाय तुझ्या #%वर तीन कोयते मारले... समाधान मुंडेची धमकी देतानाची ऑडिओ क्लीप व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget